मोहित्यांचे वडगाव मध्ये मुलांच्या अभ्यासासाठी वेगळा अनोखा उपक्रम संपूर्णगावातील. रात्री सात ते दहा टीव्ही आणि मोबाईल बंद.....

0
मोहित्यांचे वडगाव मध्ये  मुलांच्या  अभ्यासासाठी  वेगळा  अनोखा उपक्रम  संपूर्णगावातील. रात्री सात ते दहा टीव्हीआणि मोबाईल बंद.....
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क :
  (रितेश तांदळे )

सध्याच्या काळात  रात्रीच्या वेळी घरातील टीव्ही  सुरु असल्यामुळे आणि मोबाईल फोनमुळे मुलांचा अभ्यास होत नाही शिवाय मुलंच टीव्ही तसंच मोबाईल फोनच्या नादात अभ्यास करत नाहीत ही अडचण प्रत्येकाच्या घरातील आहे, पण यावर उपाय तरी काय काढायचा, मुलांना अभ्यासात कसे गुंतवायचे हा प्रश्न पालकांना पडलेला असतो.   परंतू  सांगली  जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव या गावामधील नागरिकांना देखील हा त्रास होता. मात्र या गावच्या नागरिकांनी यावर अखेर उपाय शोधला आणि तोही जालीम. घरातील टीव्ही आणि फोनच रात्री सात ते दहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वांकडून पालन व्हावे म्हणून गावातील मंदिरावर भोंगाही बसवण्यात आला आहे. भोंगा  वाजला की सर्वानी मोबाईल अणि टीव्ही  बंद करून मुलांच्या अभ्यास सुरू करायचा 
संध्याकाळी सात वाजल्यापासून घरोघरी सुरु असलेल्या मालिका आणि मुलाच्या हातात घरातील व्यक्तींचे हातात येणारे मोबाईल फोन. घरात सुरु असलेल्या या मालिकेचा आणि मुले वापरत असलेल्या मोबाईल फोनचा थेट परिणाम हा मुलांच्या अभ्यासावर होत आहे.
9270135000 
 (Order now for discount)
 250 आजारा पासून  मुक्तता 
 (वेल बायो  मॅग्नेटिक  मॅटरेस) 


 म्हणूनच कडेगाव तालुक्यातील  हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मोहित्यांचे वडगावमध्ये ग्रामसभेत मालिका आणि मोबाईल फोनचा मुलांच्या अभ्यासावर होणारा गंभीर परिणाम या विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात आली व  ठराव मंजूर करण्यात आला त्यात रात्री सात ते दहा हा तीन तासांचा हा कालावधी टीव्ही अणि मोबाईल  बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी एकमताने निश्चय केला आणि  अंमलबजावणी देखील सुरु झाली. या निर्णयामुळे  मुलांच्या अभ्यासा मध्ये बराच मोठा फरक पडलेला दिसून आला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top