महाराष्ट्र राज्यात काल सोन पावलांनी गौराईचे आगमन होऊन आज गौरीचे पूजन

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 महाराष्ट्र राज्यात गणपती बाप्पा विराजमान झाले नंतर काल गौराईचे आगमन झाले आहे व आज गौराईचे पूजन सोहळा संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक घरात विधी व परंपरेनुसार आवाहन करून गौरीची स्थापना केली जात असून ,गौरीस्थापना केल्याने घरात सुख समाधान शांती समृद्धी लाभत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे. विघ्नहर्ता श्री गणरायाचे धुमधडाक्यात आगमन झाल्यानंतर या आनंदात आणखी वाढ करणाऱ्या गौराईचे सुद्धा काल सोन पावलांनी आगमन होऊन, आज गौरीचे पूजन होत आहे . *लक्ष्मी कशाने आली लक्ष्मी माणिक मोत्याने आली* असे म्हणत वाजत गाजत उत्साहाच्या वातावरणात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात घरोघरी मोठ्या उत्साहाने गौरीची स्थापना करून पूजन झाल्याचे पहावयास मिळते आहे .काल पारंपारिक रिती रिवाजाप्रमाणे लक्ष्मीची पाऊले घरासमोर काढून वाजत गाजत गौराईचे घरी आगमन झाले व आज गौरीला छान छान दागिने ,फुलांचे हार ,नव्या साड्या नेसून व आरास करून सजवले जाते व गौरीला पंचपक्वान्नाचे जेवण नैवेद्य म्हणून करून दाखवण्यात येतो. यामध्ये 16 भाज्या व पंचपक्वान्न यांचा समावेश असतो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top