कोल्हापूर जिल्ह्यात श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा दक्षिण द्वार सोहळा संपन्न

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे, यंदाच्या वर्षीचा तिसऱ्यांदा दक्षिण द्वार सोहळा, काल पहाटे ५.०० वाजता संपन्न झाला. गेले काही दिवस कोयना धरणाच्या व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्याने, कोयना धरणातून व चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने यंदाच्या वर्षीचा तिसरा दक्षिणद्वार सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे संपन्न झाला. महाराष्ट्रात सांगली ,सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने तसेच कोयना व चांदोली व राधानगरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्याने ,वरील धरणांच्या मधून पाण्याचा विसर्ग करणे क्रमप्राप्तझाले होते .त्यामुळे कृष्णा नदीला ,वारणा नदीला व पंचगंगा नदीला पूर येऊन पाण्याच्या पातळीत ,फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .मागील २४ तासात कृष्णा व पंचगंगेच्या पाण्याच्या पातळी ४ फुटानी वाढ झाली असल्याने श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे, तिसऱ्यांदा मंदिरात श्री पादुकांच्यावर पाणी येऊन सुमारे पहाटे ५.०० वाजता चढता दक्षिण द्वार सोहळा झाला. सध्या पितृपक्ष पंधरवडा असल्याने व गुरुवार असल्याने दक्षिणा द्वार सोहळ्यासाठी श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे, दत्त भाविकांनी स्नानासाठी व दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. देवस्थान मंदिर समिती प्रशासनाने याची दक्षता घेऊन सुरक्षा वाढवली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top