महाराष्ट्रातील ‘लम्पी स्कीन’मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत...

0


आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या पाठपुराव्याला यश...


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसंदर्भात विनंती केली होती. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या महिन्यात वारणा उद्योग समुहाला भेट दिली होती. त्यावेळी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी लम्पी आजाराने मुत्यु झालेल्या पशुधनासाठी लवकरात लवकर मदत मिळावी अशी विनंती केली होती...


'लम्पी स्कीन’ आजार होऊन मृत झालेल्या पशुधनासाठी पशुपालकांना आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून ही मदत दिली जाईल. या साठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दूधाळ पशुधनासाठी ३० हजार, ओढकाम करणाऱ्या पशुधासाठी (बैल) २५ हजार, तर वासरांना १६ हजार रुपये अशी मदत मिळेल. ही मर्यादा अनुक्रमे तीन, तर वासरांसाठी ६ ठेवण्यात आली आहे...


या बाबत दोन दिवसापूर्वी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार राज्य सरकार तर्फे मदत देण्यात येणार आहे. यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. तरी लम्पी स्किन या रोगामुळे ज्या शेतकऱ्यांची जनावरे मृत झाली आहेत त्यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले आहे...


मदत देण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा पशुचिकित्सालयांचे प्रमुख समितीमध्ये असणार आहेत. सदर योजनेचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे...

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top