कोल्हापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने टोल नाक्यावर सुरू असलेल्या टोल वसुली च्या विरोधात आंदोलन

0



 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


कोल्हापूर येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर पोलिसांनी, सर्व मनसेच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने, किणीटोलनाका परिसरातील काही काळ वातावरण तणावपूर्वक झाले होते. गेले काही दिवस पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावरील चालू असलेल्या टोल वसुलीच्या बाबतीत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. दुपारी दीड वाजता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव हे स्वतः कार्यकर्त्यांसमवेत दोन लक्झरी बसने टोल नाक्यावर दाखल झाले होते. " *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो"," बंद करा बंद करा टोल वसुली बंद करा"* अशा घोषणा देत आंदोलन कार्यकर्ते, शासनाचा निषेध नोंदवून आंदोलन करत होते. मनसे आंदोलनकर्त्यांनी आणलेली तिरडी व मडके पोलिसांनी काढून घेऊन जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह बळाचा वापर करून ताब्यात घेतले त्याबरोबरच महिला कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन, पेटवडगाव पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. अचानक झालेल्या कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळे, वातावरण काही काळ तणावपूर्वक बनले होते. पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन सुद्धा बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढले तरी यापुढे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहील असे मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले .या आंदोलनामध्ये प्रवीण माने ,नागेश चौगुले ,नयन गायकवाड, फिरोज मुल्ला यांच्यासह या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांचे मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाच्या तीन तुकड्या सह जयसिंगपूर ,हातकणंगले, पेटवडगाव आदि पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top