टीम इंडिया ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेला हरविण्यासाठी सज्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

0

एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे. शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतही संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. या मालिकेत अशा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते ज्यांना टी२० विश्वचषकात स्थान मिळाले नाही. शुभमन गिल फक्त सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथून सुरुवात होणार असून भारतीय संघ २८ तारखेला दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. टी२० विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर दोन टी२० मालिका खेळायच्या होत्या. त्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने २-१ असा विजय मिळवला असून गेल्या काही महिन्यात एकदाही न हरलेल्या आफ्रिकेशी भारत उद्यापासून भिडणार आहे. बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका उद्यापासून
दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. भारतीय संघाला २८ सप्टेंबरपासून टी२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची द्विपक्षीय मालिका असणार आहे.

टी२० मालिका
पहिला टी२०: २८ सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, संध्याकाळी ७.३० वाजता
दुसरा टी२०: २ ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी ७.३०
तिसरा टी२०: ४ ऑक्टोबर, इंदोर, संध्याकाळी ७.३०

एकदिवसीय मालिका
पहिली एकदिवसीय: ६ ऑक्टोबर, लखनऊ, दुपारी १.३०
दुसरी एकदिवसीय: ९ ऑक्टोबर, रांची, दुपारी १.३० वाजता
तिसरी एकदिवसीय: ११ ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी १.३० वाजता
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका संघ
टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसेन, तबरेज शम्सी.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top