केंद्री भूत प्रवेश प्रक्रिया साठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांक पर्यंत सादर करण्यास मुभा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

0

 

 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये अंतर्गत, शैक्षणिक वर्ष 2022 23 साठी, विविध अभ्यासक्रमासाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे, प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांक पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया द्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशित होताना विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात .त्यामध्ये EWS/NCL/CVC/TVC  या प्रमाणपत्राचा समावेश असतो. ही सर्व प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना वेळीच प्राप्त करून घेण्यासाठी, अनेक अडचणींना सामोरे जावेत लागत असल्यामुळे तसेच तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र मिळवून विहित वेळेत, केंद्रीय प्रवेश नियमक प्राधिकरणास सादर करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ला, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ,सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांक पर्यंत मूळ प्रमाणपत्रे केंद्रीय प्रवेश नियमक प्राधिकरणास सादर करण्यास मुभा देण्यात आली आहे असे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top