राजू श्रीवास्तव यांचा जगाला अखेरचा निरोप, सर्वांना हसवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड...

0
सर्वांना हसवत घराघरात प्रसिद्ध झालेला कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने अनेकांचे हृदय सुन्न केलं आहे. गेल्या 41 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालय येथे राजू श्रीवास्तव उपचार घेत होते. मात्र आता समोर आलेल्या बातमीनुसार त्याचं निधन झालं आहे.
राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखरेचा श्वासः
गेल्या 41 दिवसांपासून राजू व्हेंटिलेटर वरच होते. त्यामुळे त्याचं कुटुंब देखील चिंतेत होतं. धक्कादायक बाब म्हणजे, 41 दिवस व्हेंटिलेटर वर असताना राजूंना एकदाही शुद्ध आली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांचा देखील टेन्शन वाढलं होतं. 10 ऑगस्ट रोजी राजू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. राजूंच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा, असं आवाहन राजू यांची मुलगी अंतरा हिने चाहत्यांना केलं होतं. काही दिवसांपूर्वीच राजू यांची तब्येत स्थिर झाली आहे, असं सांगण्यात आलं होतं. मात्र तब्येतीमध्ये सुधारणा जास्त काही प्रमाणात होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. राजू यांना अनेकदा ताप देखील येत होता. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या पाईप बदलल्या होत्या, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोगाचा धोका त्यांना होऊ नये. तसेच संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांनी राजूच्या पत्नीला आणि मुलीला देखील राजू यांना भेटण्यासाठी परवानगी दिली होती.
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top