सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतील नगररचना विभागातील कंत्राटी अभियंता अल्ताफ मकबूल उर्फ महंमद मकानदार सेवेमधून लवकर होणार कार्यमुक्त

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी )


सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतील नगररचना विभागातील मानधनावरील कार्यरत असलेला अभियंता अल्ताफ मकबूल उर्फ मोहम्मद मकानदार वय 44 वर्षे राहणार मिरज यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटके संदर्भातील कारवाईच्या अहवालाच्या आधारे, महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिलेले आहेत. मिरज परिसरातील रहिवासी असलेल्या तक्रारदार व्यक्तीस प्लॉटचे एकत्रीकरण व त्यावर बांधकाम परवाना मिळण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागातील मानधनावरील शाखा अभियंता अल्ताफ मकबूल उर्फ मोहम्मद मकानदार याने सुरुवातीस पंचेचाळीस हजार नंतर चाळीस हजार व त्यानंतर शेवटी तडजोडीअंती तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाडगे यांच्या टीमने दोनच दिवसापूर्वी सदरहू कंत्राटी शाखा अभियंता अल्ताफ मकबूल उर्फ महंमद मकानदार यास अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. नुकताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिका प्रशासनास अटके संदर्भातील कारवाईचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या अहवालाच्या आधारे मानधनावरील शाखा अभियंता मकानदार यास सेवेतून कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासनास दिले आहेत .सदरहू प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या आणखी काही अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बोलावल्याचे समजते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागास, मकानदार याच्या घरी व कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांच्या बाबतीत, त्याचे कडे कसून चौकशी चालू केली असून ,त्याबरोबरच सदरहू प्रकरणात अटकेत असलेल्या मकानदाराच्या सर्व मालमत्तेची ही संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाडगे यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top