सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये हिसडा मारून मौल्यवान दागिने चोरणाऱ्या दोन अट्टल सराईत चोरट्यांना अटक

0
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 
( अनिल जोशी) 

तासगाव येथे गणेशोत्सवाच्या व रथोत्सवाच्या दरम्यान गर्दीमध्ये हातोहात हिसडा मारून मौल्यवान सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात तासगाव पोलिस यशस्वी झाले आहेत .तासगाव पोलिसांनी सुमारे १,५०,०००रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनच्या मुद्देमालासह, सुनील राजू खुडे, वय १९वर्षे, राहणार नाथा नगर, पाथर्डी, जि.अहमदनगर व राम बबन मासाळकर, वय २२ वर्षे ,राहणार विजयनगर ,पाथर्डी ,जि. अहमदनगर यांना अटक केली आहे. यंदाच्या तासगाव रथोत्सवाच्या व गणेशोत्सवाच्या गर्दीत हिसडा  मारून सोन्याच्या चेन लंपास होण्याच्या घटना घडलेल्या होत्या. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे , तासगाव सराफ कट्टा येथे चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी एक इसम येणार असलेचे समजले. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने लावलेल्या सापळ्यात संशयादास्पद रित्या फिरणाऱ्या लाल टी-शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेल्या इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याचे जवळून सोन्याची १५ ग्रॅम वजन असलेली, रुपये ७०,००० किमतीची एक चेन व आणखीन  एक सोन्याची ८ ग्रॅम वजन असलेली रुपये ४०,०००किमतीची चेन असा एकूण १ लाख १०,०००रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदरहू इसमास  अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या आधारे त्याचे नाव सुनील राजू खुडे, वय १९वर्षे, राहणार नाथ नगर, पाथर्डी जि. अहमदनगर असे असल्याचे समजून आले . त्याचप्रमाणे दुसरा एक संशयित इसम मार्केट यार्ड समोरील बागवान चौकाजवळ जाधव कृषी सेवा केंद्रासमोर संशयास्पद रित्या उभा असल्याचे कळाले. त्यानुसार निळा टी-शर्ट व निळी जीन पॅन्ट घातलेल्या संशयित इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता रुपये ३५,००० किमतीची सोन्याची चेन आढळून आली. त्या इसमास अटक करून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याचे नाव राम बबन मासाळकर ,वय २२वर्षे ,राहणार विजयनगर पाथर्डी जि. अहमदनगर असे समजले. दोन्हीही अट्टल चोरांनी  पोलीस तपासात चोरीच्या कबुली दिल्या असून, जप्त केलेल्या चेन फिर्यादी यश जयप्रकाश किर्दत्त, वय २२वर्षे ,राहणार कुपवाड जि.सांगली ,गजानन शंकर राऊत वय ६९वर्षे ,राहणार पुणदी रोड, तासगाव, माणिक श्रीधर चव्हाण, वय ५५ वर्षे, राहणार ज्योतिर्लिंग मंदिराजवळ, तासगाव यांच्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले मॅडम ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली होऊन, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित परीट, पोना सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते ,रवींद्र गोसावी ,पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे, सतीश खोत, दत्तात्रय जाधव ,विनोद सकटे ,पद्मश्री मगदूम आदींनी कारवाईत भाग घेतला.



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top