सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या विशेष महासभेत सरसकट पाणी बिल आकारणेचा निर्णय मागे घेऊन समस्त सांगलीकर नागरिकांना दिलासा

0

 *जन प्रतिसाद न्यूज नेटवर्क* 
 ( *अनिल जोशी)* 

 काल झालेल्या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या विशेष सभेत सरसकट सर्व गाळेधारक ,सर्व झोपडपट्टी धारक, सर्व खुले भूखंड, सर्व ग्रुप कनेक्शन वर ,2019 मधील ठरावानुसार आकारण्यात आलेली पाणीपट्टीची बिले आकाराची नाहीत असा ठराव झाला आहे .फक्त ज्यांची पाणी कनेक्शन आहेत त्यांना पाणी बिल हे घरपट्टी बिलाबरोबर एकत्रित देणेचा निर्णयही झाला आहे .तसेच ज्या अपार्टमेंटमधील मीटर बंद अवस्थेत असतील त्या सर्व सदनिका धारकांना,2019 च्या महासभेतील ठरावानुसार , किमान मासिक दराने बिल आकारणी करावी असा निर्णय झाला आहे .प्रारंभी आयुक्त सुनील पवार यांनी या पाणी बिलाबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर नगरसेवक शेखर इनामदार विष्णू माने यांनी वॉटरवर्सच्या गैरकारभाराबाबत ,घोटाळ्याबाबत गोष्टी निदर्शनास आणल्या व त्यानंतर भारती दिगडे ,आनंदा देव माने, मनोज सरगर, स्वाती शिंदे,हरिदास पाटील यांनी आपापल्या भूमिका व बऱ्याच मागण्या बोलताना केल्या. सुब्राव मद्रासी यांनी तर खुल्या भूखंडांना पाणी बिल आकारणे वरून प्रशासनास खडे विरोधाचे बोल सुनावले. लक्ष्मण नवलाई यांनी तर सरसकट पाणी बिल आकारणीवरून महापालिका प्रशासनास आंदोलन करून टाळे ठोकण्याचा इशारा दिला .सरसकट पाणी बिल आकारणीच्या प्रशासनाच्या भूमिकेस कल्पना कोळेकर, विनायक सिंहासने , मैनुद्दीन बागवान ,संजय मेंढे ,शेडजी मोहिते, मयूर पाटील, अजिंक्य पाटील, मंगेश चव्हाण ,प्रकाश मुळके, अभिजीत भोसले ,संगीता खोत आदि नगरसेवकांनी कडाडून विरोध केला .यानंतर विशेष महासभेस महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अश्वस्त करून, यापूर्वी झालेली सर्व गाळेधारक, सर्व झोपडपट्टी धारक, सर्व ग्रुप कनेक्शन व खुले भूखंड यांना सरसकट दिलेली पाणी बिले आकारणी होणार नसून फक्त 2019 च्या ठरावानुसार अपार्टमेंटमधील मीटर बंद अवस्थेत असलेल्या सर्व सदनिकांना किमान मासिक भाडे दराने पाणी बिल आकारण्यात येईल असे सांगितले .याबरोबरच मीटर रिडींग ची अत्याधुनिक यंत्रणा, बोगस कनेक्शन चा शोध ,बिल दुरुस्तीचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याकडे देणे, पेंडिंग कनेक्शन त्वरित देणे ,या सर्व गोष्टी प्रशासनामार्फत राबवण्याचे उद्दिष्ट ठेवून पूर्ण केले जाईल असे सांगितले.
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top