कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी एफआरपी देणार-- माजी मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखाने ,शेतकऱ्यांच्या उसाचा मोबदला म्हणून एक रकमी *एफ .आर .पी* .देणार असल्याची घोषणा माजी मंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक मुश्री यांनी केली आहे. जिल्हा बँकेच्या सभेत शेतकरी संघटनेकडून, सदरहू मुद्दा मांडण्यात आला होता. या गोष्टीस अनुसरून, त्यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वतीने, यंदा शेतकऱ्यांच्या उसाला, एक रकमी *एफ. आर. पी.* देण्यात येईल अशी घोषणा केली .शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते जालिंदर पाटील यांनी हा विषय ,जिल्हा बँकेच्या सभेत उपस्थित केला होता. त्यावेळी जिल्हा बँकेच्या सभेत, विविध साखर कारखान्यांचे चेअरमन उपस्थित होते .दरम्यान नुकताच शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी *एफ. आर. पी* . न दिल्यास कोणतेही कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेने दिला होता. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ,यंदाच्या हंगामात, सर्व कारखाने शेतकऱ्यांना एक रकमी *एफ. आर. पी*. देतील अशी घोषणा माजी मंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. सदरच्या शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी, *एफ. आर. पी* .* देण्याच्या निर्णयास सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी संमती दर्शवली असून, यंदा शेतकऱ्यांना दोन किंवा तीन हप्त्याऐवजी एका हप्त्यातच शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी *एफ. आर. पी* . मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top