कोल्हापूर येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूर जवळ कर्नाटक डेपोच्या एसटी बसचा अपघात होऊन एक ठार तर सहा जखमी

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीक टोप- संभापूर जवळ, टोयोटा शोरूम जवळ ,कर्नाटक डेपोच्या एसटी बसला अपघात होऊन १ ठार तर६ प्रवासी जखमी झाले आहे. अपघातग्रस्त जखमींना, कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हा अपघात सोमवारी रात्री उशिरा झाला आहे .या अपघातात सुधीर भाऊसाहेब पाटील, वय 32, रा. कुर्ली ता. निपाणी, जि. बेळगाव हे मयत झाले असून तर मौला आबालाल बागवान रा. चिकोडी, रोहिणी मारुती कदम रा. बसर्गे, ईशा बाळासाहेब कांबळे रा. पुणे, चंद्रशेखर लक्ष्मण गावडे रा. पुणे, रुकय्या बाळून हुसेन सौदागर रा. बेळगाव ,बसवाहक- रवी कुमार अशी जखमींची नावे आहेत .संबंधित अपघाताची पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ,कर्नाटक डेपोची बस हुबळी येथून मुंबईकडे निघाली होती व सुमारे रात्री बारा वाजण्याच्या आसपास टोप- संभापूरच्या हद्दीत टोयोटा शोरूम जवळ, दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना, रात्रीच्या वेळेला रस्त्याचा अंदाज बस चालकास न आल्याने ,भरधाव वेगाने जाणारी कर्नाटक डेपोची एसटी  बस, महामार्गाच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर आदळली. भरधाव वेगाने असणाऱ्या बसमुळे, बस चालकाचा बस वरील ताबा सुटून, महामार्गावरून सेवा मार्गावर जाऊन बस पलटी झाली. सदरहू अपघात रात्री बाराच्या सुमारास घडल्याने प्रवासात एकच गोंधळ उडाला. सदरच्या अपघाताची बातमी कळताच, शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व तातडीच्या उपचारासाठी जखमी ना रुग्णवाहिकेतून ,कोल्हापूरच्या सी.पी.आर.हॉस्पिटलमध्ये पाठवले सदरहू अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top