महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आमदार , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मागण्यांसाठी व समस्यांसाठी ११ सप्टेंबर पासून पुणे ते मुंबई पायी दिंडी काढणार

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )


महाराष्ट्र राज्यात कोणतेही सरकार आले तरीही शिक्षण क्षेत्रातील समस्या सुटण्याच्या मार्गावर दिसत नसल्याने ,राज्यातील शिक्षक आमदार ,११ सप्टेंबर पासून पुणे ते मुंबई पायी दिंडी काढून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहेत. आपल्या पायी दिंडीची सुरुवात मुलींची पहिली शाळा भिडेवाडा, दगडूशेठ हलवाई मंदिर समोर या ठिकाणाहून करणार आहेत. सदरहू पायी दिंडीच्या आंदोलनाचे नेतृत्व कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे चार आमदार करणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील आपल्या मागण्यांसाठी व समस्यांसाठी सदरहू पायी दिंडीचे पुण्यावरून मुंबईला प्रस्थान होणार आहे. दि. १५ -११ -२०११ चा शासन निर्णय त्वरित लागू करून प्रचलित धोरण सर्व विनाअनुदानित अंशतः अनुदानित सेवकांना सुरू करणे ,त्रुटी पूर्तता शाळेचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करणे, शासन स्तरावरील ३९६१ शाळा वर्ग व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या यांना तात्काळ निधी सहित घोषित करणे, विनाअनुदानित अंशतः अनुदानित सेवकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय निर्गमित करणे, एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे ,जुनियर कॉलेजमधील वाढीव पदांना मंजुरी व अनुदान लागू करणे आदि मागण्यांचा यात समावेश असून ,महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शिक्षण क्षेत्रातील असलेल्या समस्यांचा कायमचा निपटारा होऊन शिक्षकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी गांधीगिरी मार्गाने सदरहू आंदोलन करण्यात येत आहे .जर राज्य शासनाने या मागण्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुढील काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी दिला आहे .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमच्या शिक्षकांच्या असलेल्या मागण्या व समस्यां समजून घेऊन योग्य तो मार्ग काढतील असा आशावाद अमरावती विभागाचे शिक्षक आमदार तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पुणे ते मुंबई मंत्रालय पायी दिंडीसाठी शिक्षक बांधवांनी प्रचंड प्रमाणात सहभागी होऊन, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन अघोषित शिक्षक महासंघाचे राज्याचे समन्वयक तथा शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रवींद्र गावडे यांनी केले आहे . अघोषित महासंघाचे राज्य समन्वय श्रद्धेश कुलकर्णी प्राध्यापक योगेश नंदन प्राध्यापक अर्जुन मुंडे प्राध्यापक गजानन खैरे प्राध्यापक शिवशंकर स्वामी या शिक्षकांशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top