कोल्हापूर जिल्हा कॅरम स्पर्धा- रोहित चौगुले विजेता तर गौरव हुदले उपविजेता.

0

 रोहित चौगुले विजेता तर गौरव हुदले उपविजेता.


- कोल्हापूर जिल्हा कॅरम स्पर्धा.

कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

 

 जिल्हा खुला गट कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित चौगुलेने गौरव हुदलेचा २५/१३, २५/१० अशा सेटमध्ये पराभव करून "आयुर्विमा चषका" चा मानकरी ठरला. या विजयासह रोहितने आपल्या कारकिर्दीतील दुसरे विजेतेपद मिळविले.


कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर कॅरम असोसिएशनचेतर्फे "आयुर्विमा चषक " स्पर्धा स्वामी विवेकानंद काॅलेज मधील लायब्ररी हाॅल येथे घेण्यात आल्या. 

 पुरुष गटातील अंतिम सामना रोहित चौगुले यांनी ओळीने दोन बोर्ड घेऊन ७ गुण घेऊन आघाडी घेतली. तिसरा बोर्ड गौरवने ४ गुण घेऊन आघाडी कमी केली.

पुढील गेममध्ये रोहितने अचुक खेळ संयम राखत व उत्कृष्ट कट मारून पहिला गेम २६/१३घेऊन १/०अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या गेममध्ये गौरव अनेक चुका करू लागला, याचा फायदा रोहितने अचुक घेतला. तसेच समोरील पिसेस अचुक घेऊन, सुंदर ब‌ॅक हॅन्ड घेत दुसरा गेमही २६/१० घेऊन जिल्हा अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकावले. 


विजेत्या रोहितला रोख बक्षीस ५ हजार रुपये रोख व आयुर्विमा चषक तर उपविजेत्या गौरवला यास रोख रू ३ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.


तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य सामन्यात गतवर्षीचा विजेता इक्बाल बागवानला गौरवने तर रोहितने सुनील कांबळे याला हरवून अंतिम फेरीत धडक मारली.  

दरम्यान, तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात इक्बालने सुनील कांबळेला हरविले. तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या इक्बालचा

  २हजार रु रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या सुनील कांबळेचा रूपये १ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.


 या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्वामी विवेकानंद काॅलेज चे नुतनम मुख्य कार्यकारी अधिकारी, कौस्तुभ गावडे, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे व या स्पर्धेचे प्रायोजक एल आय सी आॅफ इंडियाचे प्रतिनिधी उप प्रशासन अधिकारी उमेश दिवेकर या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. 

 

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कौस्तुभ गावडे यांनी कॅरम खेळाडूनी आपल्या जीवनामध्ये वेळ व शिस्त व योग्य नियोजन केल्यास आपणांस कधीच अपयश येणार नाही. निर्व्यसनी राहून कॅरम खेळाचा मनमुराद आनंद लुटा व कॅरमचा नांव लौकिक वाढवा. असे सांगून

त्यांनी ज्युनिअर सब ज्युनिअर युवक कॅरम स्प्रर्धा घेणेचा मनोदय व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा कॅरम संघटना कॅरम खेळांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. असेही यावेळी त्यांनी सांगितले.


 सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष मुरलीधर गावडे, हितेंद्र सांळुखे, सहसचिव जयवंत नलावडे, प्रा किरण पाटील, गौरव हुदले, आशिष हांडे, भरत पाटील.कुण्णीभावीसर, आकाश शिंदे, राजू यादव,सुरेश चरापले यांनी विशेष प्रयत्न केले. लाईटचे काम राम बोंगे तर प्रमुख पंच म्हणून नामदेव टमके, आशिष हांडे, शोभा कामत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा किरण पाटील तर आभार गौरव हुदले यांनी मानले.फोटो ओळ : - या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्वामी विवेकानंद काॅलेज चे नुतनम मुख्य कार्यकारी अधिकारी, कौस्तुभ गावडे, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे व या स्पर्धेचे प्रायोजक एल आय सी आॅफ इंडियाचे प्रतिनिधी उप प्रशासन अधिकारी उमेश दिवेकर या सर्वांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top