कॉपीराईट कायद्याचा भंग केलेल्या मुंबईतील ०९ दुकानांवर कारवाई

0

 कॉपीराईट कायद्याचा भंग केलेल्या मुंबईतील ०९ दुकानांवर कारवाई


-  FOSSIL GROUP कंपनीचे बनावट पार्ट विक्री करून

प्रकरणी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ०६ जणांना अटक


-  कंपनीचा एकूण ५९ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त




मुंबई : (जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)


मुंबई येथे सोमवारी (दि.२६/०९/२०२२)  FOSSIL GROUP ची नक्कल केलेल्या आणि कॉपीराईट कायद्याचा भंग केलेल्या ०९ दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून FOSSIL GROUP कंपनीचा एकूण ५९ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ०६ 

जणांना अटक करण्यात आली.



- FOSSIL GROUP कंपनीचा एकूण ५९ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 


याबाबत मिळालेली माहिती अशी, आर्किड बिल्डिंग गुलशन- ए- इराण पाठीमागे, मुसाफिर खाना मुंबई येथे असलेल्या दुकान नं.१२६,१२७, १२८,१३१,१३२, १३३, १३४, १३५ व दुकान नं.६० या दुकानांवर  FOSSIL GROUP मधील (DIESEL, ARMANI, M.K. MICHAEL, KORS, FOSSIL. या कंपनीच्या सर्व वस्तूंचे बनावट पार्ट आढळून आल्याने व पंचासमक्ष खात्री झाल्याने दुकानधारक उमेशसिंग रानाराम पुरोहित, अशोक मगाराम देवासी, हितेश पुखराजी पुरोहित, श्रावणकुमार जवाहरराम पुरोहित, अहमद अमर हलाई, हिम्मतगिरी भुरगिरी गोस्वामी, या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून FOSSIL GROUP कंपनीचा एकूण ५९ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. व फॉसिल ग्रुप कंपनीच्या बनावट पार्टची विक्री ही नफेखोरी व साठवणुकीच्या उद्देशाने केल्यामुळे त्यांच्यावर कॉपीराईट कलम ६३ अन्वये कारवाई करण्यात आली.


दरम्यान, सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त परिवहन-1 यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर घाडगे त्यांचे पथक व  ANTI PIRACY GROUP SERVICES LLP चे तपासी अधिकारी प्रसादबाबू व्यंकटेश बटला व त्यांचे सहकारी श्री. रेवनाथ विष्णू केकन यांनी केली.


- ANTI PIRACY GROUP SERVICES  LLP या कंपनीची कारवाई



 FOSSIL GROUP च्या सर्व वस्तूंचे व उपकरणांचे सर्व हक्क ANTI PIRACY GROUP SERVICES  LLP या कंपनीला देण्यात आले आहेत. सदरच्या कंपनीला मुंबई येथील काही दुकानांमध्ये FOSSIL GROUP च्या बनावट पार्टची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने कंपनीचे तपासी अधिकारी प्रसादबाबू व्यंकटेश बटला व त्यांचे सहकारी  रेवणनाथ विष्णू केकन यांनी सदर बातमीची शहानिशा करून सदर दुकान व मालकांवर कारवाई करण्याकरिता मा. पोलीस उप आयुक्त परिवहन-1 मुंबई यांचे कार्यालयातून रीतसर परवानगी घेतली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक सागर घाडगे व त्यांच्या पथकाची नेमणूक केली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top