कोल्हापुरात बस चालवत असताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक पण आधी शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचून मग घेतला अखेर जगाचा निरोप

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 कोल्हापुरा राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी कडे जाणाऱ्या रोडवर, शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला यावेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून बस रस्त्याकडील बाजूला घेतली व अखेर या जगाचा त्याने निरोप घेतला. काही मिनिटापूर्वीच खोल दरी शेजारून या चालकाने रस्ता पार केल्यानंतर पुढे  हा प्रसंग उद्भवला होता. सदरहू चालकाचे नाव -सतीश सातापा कांबळे, वय वर्षे 35 ,असे असून बस सुरक्षित ठिकाणी थांबून ,बस चालकाने शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचून ,या जगाचा निरोप घेणे अशी उदाहरणे दुर्मिळ आहेत .धक्कादायक बाब म्हणजे चालकाने थोड्यावेळापूर्वीच खोलदरी जवळ असलेला अर्धा किलोमीटर चा रस्ता पार केला होता .कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी येथून भोगावती हायस्कूल ला जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बस मधून घेऊन बस चालक सतीश कांबळे हे येत होते .पिंपळवाडी ते  भोपळवाडी या मार्गालगत मोठी दरी असून हा रस्ता एकेरी वाहतुकीचा आहे .त्यामुळे बऱ्याच बस व वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतो .ही बस पिंपळवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन बरगेवाडी पर्यंत जात असताना चालक सतीश सातापा कांबळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असूनही, विद्यार्थ्यांचे प्राण वाचावेत म्हणून सदरहू बस चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन, बंद करून, आपले प्राण सोडले. सदरहू घडलेल्या घटनेमुळे बसमधील शालेय मुले मानसिक दृष्ट्या घाबरलेली होती

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top