खासदार उदयनराजे भोसले यांचे काका शिवाजीराव भोसले यांचे निधन

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
 (अनिल जोशी)

साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत व संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या शिवाजीराव भोसले यांचे, नुकतंच पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे.

 सध्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका आहेत. शिवाजीराव भोसले यांनी यापूर्वी सातारा शहराचे नगराध्यक्ष पद देखील भूषवलं होतं.

अत्यंत शांत, निगर्वी ,संयमी व्यक्तिमत्व असलेली, साताऱ्यातील राजघराण्यातील त्यांची ओळख ही बोलकी प्रतिमा आहे .मध्यंतरी सातारा जिल्ह्यात ज्यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामधील राजकीय वादाचे परिवर्तन ज्यावेळी टोकास गेले होते त्यावेळी आपल्याच राजघराण्यातील  वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान शिवाजीराजे भोसले यांच्या दुःखद निधनामुळे सातारा राजघराणे कुटुंबीयांवर आणि सातारकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top