सांगलीतील यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कारासाठी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक, पद्मश्री.सतीश आळेकर यांच्या निवडीची घोषणा

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


 सांगलीच्या नाट्य पंढरीमध्ये, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर तर्फे दिला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार, जेष्ठ नाटककार, दिग्दर्शक ,अभिनेते, पटकथा लेखक, *पद्मश्री. सतीश आळेकर* यांना जाहीर करण्यात आला आहे. सांगलीतील ५ नोव्हेंबर २०२२रोजी होणाऱ्या रंगभूमी दिना दिवशी, विष्णुदास भावे नाट्य मंदिरात विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार, प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक, रणकर्मी, डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त *पद्मश्री सतीश आळेकर* यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत केली. सदरहू विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कारात रुपये २५,००० रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ याचा समावेश आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात सदरहू विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार सोहळा झाला नव्हता .यापूर्वी सन १९५९साली पहिल्यांदा पुरस्कार बालगंधर्व यांना देण्यात येऊन, त्यानंतर प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हटगंडी यांचे सह आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विठाबाई नारायणगावकर, शरद तळवळकर, श्रीराम लागू, मोहन वाघ ,निळू फुले, फैयाज, विक्रम गोखले आदी प्रख्यात नाट्य पंढरीतील रंगकर्मी कलाकरांना देण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार प्राप्त झालेले *पद्मश्री सतीश आळेकर* हे स्वतः नाटककार, दिग्दर्शक ,अभिनेते, पटकथा लेखक असून ते पुण्याचे रहिवासी आहेत. पुण्यातील थिएटर अकादमीचे ते संस्थापक सदस्य असून ,ललित कला केंद्रा सह बऱ्याच सांस्कृतिक संस्थावर ते सध्या पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. महानिर्वाण, बेगम बर्वे, शनिवार- रविवार ,अतिरेकी या नाटकांसह यशवंतराव चव्हाण आक्रित, उंबरठा, एक होता विदूषक, चिंटू ,देवी अहिल्या आदि मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने ते सन्मानित झाले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ख्याती आहे. सदरहू पत्रकार परिषदेच्या वेळी उपाध्यक्ष विनायक केळकर ,कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष मेधा केळकर, सदस्य जगदीश कराळे ,आनंदराव पाटील, बलदेव गवळी, डॉ. भास्कर ताम्हणकर ,विवेक देशपांडे, बिना साखर्पे, भालचंद्र चितळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top