लवकर निजे, लवकर उठे ""तया आरोग्य संपदा लाभे "ह्या म्हणीप्रमाणे झोप घेण्यासाठी कोणती वेळ सर्वोत्तम आहे ?

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )


 आपल्याला पूर्वीपासून ऐकिवात आहे की, लवकर निजे ,लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे ,हे कितपत खरे आहे ?उशिरा झोपले तर चालेल का ?या गोष्टीवर या लेखातून एक व्यक्त केलेला दृष्टिक्षेप. आपले शरीर हे एक घड्याळाप्रमाणे सातत्याने अतिशय गुंतागुंतीच्या क्रिया पार पाडण्यात सदोदित कार्यरत असते .त्याबरोबरच ते आपल्या विविध दैनंदिन क्रिया सोबत झोपेच्या वेळेचेही नियमन करीत असते. खरे तर रात्री11 ते पहाटे3 या कालावधीत आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया मुख्यत्वे करून यकृतात चालू असते. आपल्या यकृतातून दिवसभर शरीरात साठलेले विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची क्रिया चालू असते .शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषारी द्रव्यांचे निष्क्रियकरण करून त्यांना बाहेर काढण्याचे अति महत्त्वाचे कार्य रात्री 11 ते पहाटे3 या वेळेत होत असते .जर आपण या वेळेत झोप घेऊ शकलो नाही तर आपल्या यकृताचे विषारी द्रव्य बाहेर फेकण्याचे कार्य सुलभरीत्या होऊ शकणार नाही .समजा आपण रात्री11 वाजता झोपी गेलो तर आपल्या यकृताला शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी4 तासांचा अवधी मिळतो .जर 12 वाजता झोपलो तर3 तासाचा अवधी, 1 वाजता झोपलो तर 2 तासाचा अवधी,2 वाजता झोपलो तर1 तासाचा अवधी आणि शेवटी 3 वाजता झोपलो तर आपल्या शरीरातील यकृताचे विषारी द्रव्य बाहेर फेकण्याचे कार्य होणार नाही. दुर्दैवाने आपल्या शरीराकडे विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी वेळच राहणार नाही .अशीच विषारी द्रव्ये शरीरात साठून साठून ,कालानुक्रमे वाढत जाऊन ,आरोग्याच्या समस्या माणसाच्या आयुष्यात उभा राहतात .एक मात्र निश्चित खरे आहे. आपण कधीतरी उशिरा झोपलो तर सकाळी उठल्यानंतर खूप थकल्यासारखे वाटते .खरे तर उशिरा झोपून उशिरा उठणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे .आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याच्या कार्याशिवाय शरीरातील आणखी अति महत्त्वाच्या क्रियांच्या कार्याचे वेळापत्रक सुद्धा बिघडते. याउलट पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफुसांच्या मध्ये केंद्रित असते .सकाळी 5 ते 7 च्या वेळेत रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. या कालावधीत शौचकर्म उरकून, शरीराला आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी पोषक वातावरण तयार होणे महत्त्वाचे आहे. सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान रक्ताभिसरणाची क्रिया ही पोटाच्या ठिकाणी केंद्रीत असते. यावेळी संपूर्ण पोषण आधारित नाश्त्याचा आहार घेणे महत्त्वाचे आहे. या उदाहरणा नुसार आपण आपल्या दैनंदिन नैसर्गिक वेळापत्रक तयार करून आपल्याला भविष्यात कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. खरे तर आजही ग्रामीण भागातील व शेतावर राहणारे शेतकरी सुद्धा, शारीरिक दृष्ट्या निरोगी व सदृढ असतात याचे कारण लवकर झोपणे लवकर उठणे व शारीरिक नैसर्गिक घड्याळाचे तंतोतंत पालन करणे हे होय. याउलट शहरातील लोकांना झोपेचे वेळापत्रक पाळताना खूप अवघड आहे कारण प्रखर विद्युत प्रकाश, टीव्ही ,इंटरनेट वापर, मोबाईल वापर असल्यामुळे अमूल्य अशी झोपेची वेळ पाळणे शक्य नाही. त्यामुळे आज-काल आरोग्यविषयक तक्रारीवर बऱ्याच प्रमाणात खर्च करावा लागत आहे. दूरदृष्टीने विचार केला तर आपल्या कमाई पेक्षा आरोग्यावर खर्च जास्त होत आहे. या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी दैनंदिन नैसर्गिक वेळापत्रक असे तयार करा की संपूर्ण दिवस अधिक उत्साही व ताजेतवाने राहाल अशी आशा या लिखाणात व्यक्त करत आहे. सदर लिखाण हे विविध तज्ञांची मते विचारात घेऊन जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top