फॉक्सकॉन प्रकल्पासाठी कंपनीला गेल्या दोन वर्षातील जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो कमी पडला असावा--मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0



 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )



महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? या विरोधकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- आमचे सरकार येऊन नुकतेच दोन महिने झाले आहेत, मी स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल आणि फॉक्स कॉन सोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीस देखील माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. सदर बैठकीत महाराष्ट्र शासनाकडून ज्या सवलती देणे शक्य आहे ,त्या सर्व आपणास दिल्या जातील असे अभिवचन मी त्यांना दिले होते. पुण्यातील तळेगाव जवळ  ११०० एकर जमीन ,३०००० ते ३५०००  कोटींची सवलतीचे अनुदान व अन्य काही गोष्टींमध्ये सवलत देण्याचे अभिवचन सरकारच्या वतीने दिले होते. सरकार म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नसून, नवीन आमच्या सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. परंतु गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो कमी पडला असावा असे मला वाटते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सदरहू प्रकल्पासाठी अजूनही महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत या विरोधकांच्या मागणीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, निश्चितच आम्ही प्रयत्न करू तसेच याबाबतीत पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो असताना महाराष्ट्राच्या हिताचे जास्तीत जास्त निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीत उद्योग व पायाभूत सुविधा बाबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सद्य परिस्थितीत तरी खणीकर्म क्षेत्रातील मोठी कंपनी असलेली वेदांत व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीमध्ये तैवांची मोठी कंपनी फॉक्सऑन यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले असून तो आता गुजरात राज्यात साकारेल  असे दिसत आहे. नुकत्याच या करारावर मंगळवारी गुजरात सरकार तर्फे गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा यांनी स्वाक्षरी केली असून सदरहू प्रकल्प १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top