अथिया शेट्टी आणि के एल राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात...

0
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल. राहुल यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. आता एका बातमीनुसार अथिया आणि राहुलच्या लग्नाचा बार लवकर उडविण्यात येणार आहे. अथिया आणि क्रिकेटर के एल राहुल डिसेंबर 2022 मध्ये सात फेरे घेणार आहेत.
‘तडप’सिनेमाच्या प्रीमिअर दरम्यान नुकतेच अथिया आणि के. एल. राहुल एकत्र स्पॉट झाले होते. रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याची सुनील शेट्टींनी तयारी सुरू केली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये अथिया आणि के एल राहुल यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी डेस्टिनेशनही निवडण्यात आले आहे. अथिया आणि राहुलने गेल्या वर्षी त्यांचे नाते सार्वजनिक केले आणि तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुक त्यांच्यासह चाहत्यांना लागली आहे. आता तर लग्न कुठे होणार याची माहिती हाती आली असल्यानं चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अथिया आणि के.एल. राहुल दोघंही महाराष्ट्रातच लग्न करणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्याच्या जहान या बंगल्यामध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top