सांगली जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचा जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी...

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त सांगली यांचे कडील पत्र जा. क्र. जीप३आ/ तांत्रिक- २/ एल. एस. डी. अधिसूचना आदेश/ ५४२७-२९/२०२२ मिरज, दि.०८.०९.२०२२ चे पत्रानुसार, राज्यातील १७ जिल्ह्यामधील, ५९ तालुक्यांमध्ये, सद्यस्थितीत गो व महिष वर्गीय पशुधनांमध्ये, लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात शेखरवाडी व चिकुर्डे या गावांमधील अनुक्रमे ४ लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरित गाई व १ लम्पीचर्मरोग सदृश्य बाधित संकरित गाई मधील रक्त नाकातील स्त्रावाचे स्वॅप्स व अंगावरील नोड्युलचे स्क्रॅपिंग नमुने प्रयोगशाळेतून लम्पी चर्मरोगासाठी होकारार्थी आले आहेत. त्यामुळे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यात उद्भवलेल्या गो व महिष वर्गीय पशुधनातील लम्पीरोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, सदरहू रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे आपल्या आदेशात नमूद केले आहे .तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सांगली यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून ,सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी भा.प.से. यांनी त्यांना क्रमांक १ अन्वये प्राप्त झाले अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश पारित केले आहेत.

१)शेतकरी गोपालक यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची जनावरांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे.

२)सांगली जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यामध्येही लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाले चे निदर्शनास आले असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार भरवण्यास मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील इतर सर्व आठवडी बाजारामध्येही जनावरांची खरेदी विक्री व प्रदर्शन होत असलेस, त्यालाही मनाई करण्यात येत आहे.

३)बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणेस सक्त मनाई करण्यात येत आहे.

सदरहू आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,पोलीस अधीक्षक ,स्थानीक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे नमूद केले आहे .सदरचा आदेश दि.१२/०९/२०२२ रोजी चे ०१ वाजले पासून ते दिनांक ११/१०/२०२२ रोजीचे२३:५९ वाजेपर्यंत अंमलात राहतील असे आदेशात नमूद केले आहे.

This news is co-provided by Janpratisadnews



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top