महाराष्ट्र राज्यातील तब्बल ११६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी )


महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून ,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच ११६६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. सुमारे १८ जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीसाठी, १३ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदन यांनी आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यु .पी.एस .मदान यांनी सांगितले की ,संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील .नामनिर्देशन पत्र २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवार सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशन पत्राची छाननी २८ सप्टेंबर रोजी करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल .सदरहू ग्रामपंचायतचे मतदान १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात सदरहू निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top