महाराष्ट्र राज्यातील कोयना धरण फुल्ल क्षमतेने भरून सुमारे ३२५८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू...

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी) 

 गेली काही दिवस महाराष्ट्र राज्यात बहुतांश जिल्ह्यात, जोरदार पाऊस होत असून, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस ध्रुवंधार पडत आहे. दरम्यान बुधवारी गेल्या २४ तासात कोयने १०६ मिमी, नवजात १३७ मिमी ,तर महाबळेश्वरला ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .सध्या कोयना धरणातील पाणीसाठा १०४ टीएमसी झाला असून धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १०५टीएमसी आहे. सध्या परिस्थितीत, धरणात पाणी साठवणे अशक्य असल्याने, धरणाचे दरवाजे साडेतीन फुटापर्यंत उचलून, कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे ३२ हजार५८१ क्युसिक पाण्याचा विसर्ग केला जात आहे .त्याचप्रमाणे कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून दाेन दिवसापूर्वी विसर्ग सुरू करण्यात आलेला होता. सोमवारी कोयना धरणाचे दरवाजे सुमारे १.५ फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती. यंदाच्या वर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. सध्या परिस्थितीत कोयना धरणाची पाण्याची आवक पाहता ,बुधवारी सकाळपासून ६ दरवाजे ३.५ फुटापर्यंत वर उचलण्यात आले असून, पायथागृहातून १०५०क्युसेक पाणी विसर्ग व दरवाज्यातून ३१५३१ क्युसेक विसर्ग पाण्याचा चालू करण्यात आला आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत कोयना धरणातून एकत्र पाण्याचा विसर्ग सुमारे ३२५८१ क्युसेक असून ,कृष्णेच्या नदीपात्रात केला जात असल्याने, कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top