महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत रिक्त असलेली ९०० पदे भरण्यात येणार-- नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन.--*

0

 *महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम  निबंधकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत रिक्त असलेली ९०० पदे भरण्यात येणार-- नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन.--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी)* 

 


महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालय मध्ये असलेली, दुय्यम निबंधक श्रेणी वर्ग १ पासून लिपिक पदापर्यंत अनेक पदे रिक्त असून ,त्यामुळे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात सद्य परिस्थितीत कामाचा फारच ताण येत आहे. काही ठिकाणी लिपिकांवर दुय्यम निबंधकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सध्या परिस्थिती पुण्यात सुद्धा आजमीस २७ व ग्रामीण भागात २१ दुय्यम निबंधक कार्यालय असून, त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात दस्तांची नोंदणी केली जाते .महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात विविध पदे रिक्त असून ,काही पदांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देखील मिळणार आहे. त्यामुळे ती पदे देखील रिक्त होणार आहेत. सद्य परिस्थितीत काही अधिकारी वर्ग सुद्धा निवृत्त होण्याच्या मार्गावर मार्गावर असून परिणामी रिक्त पदांच्या संख्येमुळे अतिरिक्त ताण हा राज्य राज्यांमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात ९०० पदे भरण्याचे योजले आहे असे माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली .सदरहू महाराष्ट्र राज्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरण्यात येणाऱ्या ९०० पदांमध्ये, कनिष्ठ लिपिकांची ५२१ पदे दुय्यम श्रेणी निबंधक वर्ग १ ची ७८ पदे व शिपायांची २८४ पदे अतिरिक्त  पदे१७ यांचा अंतर्भाव आहे. सदरहू रिक्त पदे भरण्यास राज्य शासनाने देखील मान्यता देण्यात आली आहे असे समजते . येत्या दोन ते तीन महिन्यात याबाबतीत पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण होईल.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top