NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर जाणून घ्या संपूर्ण माहिती...

0
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये (National Bank for Agriculture and Rural Development, NABARD) ने विकास सहाय्यक (Development Assistant) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार नाबार्डची अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे (NABARD Recruitment 2022)विकास सहाय्यकांची एकूण १७७ पदे भरली जातील.
NABARD Job 2022: रिक्त जागांचा तपशील
एकूण पदे - १७७
विकास सहाय्यक – १७३ पदे
विकास सहाय्यक हिंदी – ४ पदे

महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - १५ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० ऑक्टोबर २०२२

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.

विकास सहाय्यक (हिंदी) पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. त्यांनी वैकल्पिक विषय म्हणून हिंदीचा अभ्यास केलेला असावा. या पदासाठी एससी/एसटी आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५० टक्के गुणांची सक्ती नाही.

अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील. तर एससी/एसटी आणि भिन्न दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना ५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. 

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३२ हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२२ पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १० ऑक्टोबर २०२२ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top