सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार एक तास राष्ट्रवादीसाठी म्हणजेच महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेली उपक्रम सभा संपन्न

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री ना.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.*

या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या,जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.*

याच आवाहनाला प्रतिसाद देत आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय (RIT) येथे 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सागर घोडके , हरिदास पाटील , विष्णू माने , योगेंद्र थोरात ,वंदना चंदनशिवे,अनिता पांगम , असिफ बावा , समीर कुपवाडे , आयुब बारगीर ,डॉ शुभम जाधव , उत्तम कांबळे , डॉ सतीश नाईक , गॅब्रियल तिवडे , सुनील भोसले ,सुरेखा सातपुते, स्वाती शिरूर , संध्या आवळे ,सुरेश बंडगर , संजय सरवदे, कुमार वायदंडे , महालिंग हेगडे , संदीप दळवी ,इर्शाद पखाली , अकबर शेख , धर्मेंद्र कोळी ,अरूण चव्हाण , प्रकाश सूर्यवंशी , राजू पवार ,आदित्य नाईक ,चंद्रकांत नाईक ,नितीन माने , सरफराज शेख ,अमित पाटील ,अभिजित रांजणे ,अमीन शेख , महादेव काळे ,सचिन सगरे , बापू कोळेकर ,सचिन पाटील , बाबासो भोसले ,आदर्श कांबळे , दत्ता पाटील , अजर सय्यद,राकेश वठार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top