"बनावट वस्तू प्रतिबंध" कारवाईस शाहूपुरी पोलिसांची टाळाटाळ...!

0

 "बनावट वस्तू प्रतिबंध" कारवाईस शाहूपुरी पोलिसांची टाळाटाळ...!


- प्रोटेक्ट आय पी कंपनी (पुणे) चे रेवणनाथ विष्णू केकान यांची माहिती.कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज क्राईम प्रतिनिधी)


एका प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीचे "बनावट पार्ट" शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तयार होत असलेची तक्रार अर्ज शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आला. ही कारवाई तत्काळ करण्यात यावी, यासाठी 

संबंधित पोलीस ठाण्याकडे व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, याकडे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली.  कॉपीराईट कायद्याअंतर्गत ही कारवाई पोलिसांनी करणे बंधनकारक असल्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत. याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली तरीदेखील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही, असे सांगितले व माझ्याविरुद्ध कोर्टात रिपीटेशन दाखल करा, असे सांगितले. यामुळे "बनावट वस्तू प्रतिबंध" कारवाईस शाहूपुरी पोलिस टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले. अशी माहिती प्रोटेक्ट आय पी कंपनी (पुणे) चे रेवणनाथ विष्णू केकान यांनी  पत्रकार परिषदेत दिली.यावेळी प्रोटेक्ट आय पी कंपनी (पुणे) चे रेवणनाथ विष्णू केकान म्हणाले, कंपनीच्या वतीने प्रथम १९ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या कागदपत्रासह लेखी अर्ज पोलीस अधीक्षक यांना व नंतर २१ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटलो.  यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवळी यांना भेटून अर्ज केला. यावेळी त्यांनी कारवाईसाठी लेखी आदेश आणा, असे सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक व डीआयजी या दोन कार्यालयांमध्ये अर्ज केला. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कारवाईत सहकार्य करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो असता त्यांनी नवरात्र उत्सव, दसरा झाल्यानंतर कारवाई संदर्भात विचार करू असे सांगितले. त्यानुसार १० ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा संबंधित पोलिस ठाण्यात कारवाई संदर्भात चौकशीसाठी गेल्यानंतर पोलीस निरीक्षक गवळी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे सांगून माझ्या विरोधात रिपीटेशन दाखल करा, असे सांगितले. 


हे हायकोर्टाचे आदेश व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन आहे. या विरोधात मी बनावट वस्तू प्रतिबंध कायद्यांतर्गत न्यायालयात दाद मागण्यासाठी रिपीटेशन दाखल करणार असल्याचा इशाराही यावेळी केकान यांनी दिला.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top