विध्यार्थ्यांनी केले २२० वृत्तपत्रांचे वितरण*

0

 *विध्यार्थ्यांनी केले २२० वृत्तपत्रांचे वितरण* 


 - माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त उपक्रम


- व्हनाळीतील जि.प.शाळेतील  इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दिला वाचन संस्कृतीचा संदेश 


 *कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्युज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)* 



भारताचे मिसाईल मॅन,मा.राष्ट्रपती महान वैज्ञानिक, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त वि.मं.व्हनाळी,ता.कागल या जि.प.शाळेतील  इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक बाळकृष्ण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली व्हनाळी गावातील २२० वाचकांना वृत्तपत्रांचे वितरण केले. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वावलंबी शिक्षणाचा जागर करताना 'कमवा व शिका 'योजनेचे महत्त्वही अधोरेखित केले. तसेच या उपक्रमाततून विद्यार्थ्यांनी  वाचन संस्कृतीचा संदेश देण्याचे कार्य केले.



 मा.राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन वृत्तपत्र विक्रेता जालंदर परीते यांचे हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना वर्गशिक्षक बाळकृष्ण चौगले यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच युवा पिढीला त्यांचे 

विचार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.



 *कु.गौरी जाधवचे उत्स्फूर्त भाषण* 


 कु.गौरी जाधव हिने वृत्तपत्राचे वाचन करुन "मी ए.पी.जे.अब्दुल कलाम बोलतोय व वृत्तपत्र वाचन काळाची गरज" या विषयावर उत्स्फूर्तपणे भाषण करून उपस्थितांची वाहवा मिळवली.


 *वृत्तपत्र विक्रेता जालंदर परीते यांचा विशेष सन्मान* 



ऊन, वारा,वादळी पाऊस, कडाक्याची थंडी, महापूर या काळातही आलेल्या अडचणीवर मात करत वत्तपत्र वाचकांना पोहोचवण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. याबद्दल वृत्तपत्र विक्रेता जालंदर परीते यांचा मुख्याध्यापक बबन चौगुले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. 


 *१५०० पुस्तकांचे भव्य प्रदर्शन* 


जय भवानी मोफत वाचनालयात थोर पुरुषांच्या प्रेरणादायी विचारांच्या १५०० पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते त्याचे उद्घाटन बाळासाहेब देशमुख सरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपाल यशवंत मेथे यांनी प्रेरणादायी अवांतर वाचनाचे महत्व सांगताना वाचन संस्कृती बळकट करण्याचे आवाहन केले.


 *उपक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम* 


जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम यशस्वी करण्यासाठी शा.व्य.समिती अध्यक्ष बाबासो आगळे, यशवंत मेथे , बाळासाहेब देशमुख, तुळशीदास माने, संदीप शितोळे, पुष्पा पाटील, साधना माने, धनश्री गुदले, विद्यार्थी, पालक आदींनी परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top