सांगली राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची, शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर---*

0

 *सांगली राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची, शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर---*


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 



सांगली राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल शहर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा तसेच,नगरसेवक विष्णू माने,माजी नगरसेवक जुबेर चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश संघटक निलेश पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले, यावेळी सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 



यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय बजाज साहेबांनी सेवादलाच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सेवादलाचे आजपर्यंत योगदान खूप मोठे आहे सेवादलाकडून हेच काम पुढे अविरतपणे सुरु राहील आणि सेवादलाला योग्य मान सन्मान आणि ताकद पक्षाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी देण्यात येईल असे नमूद केले.तसेच राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सेवादलाचे महत्व अधोरेकीत करत "एक तास राष्ट्रवादीसाठी" या पक्षाच्या संपूर्ण कार्यक्रमाची तसेच पक्षाचे महत्वाचे कार्यक्रम आयोजन करण्याची जबाबदारी ही प्रमुख्याने सेवादलाची आहे.तसेच सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे पदाधिकऱ्यांना संबोधित करताना पक्ष मजबूत करण्यासाठी आणि सक्षम ताकतीचे कार्यकर्ते येणाऱ्या काळात सेवादल महत्वाची भूमिका नक्कीच पार पाडेल.यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी बजाज साहेब,युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार,नगरसेवक विष्णू माने,अल्पसंख्यांक महासचिव समिरभाई कुपवाडे,प्रमुख सचिव शुभम जाधव,रावसाहेब नलवडे,प्रफुल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.



पुढीलप्रमाणे कार्यकारणी-

 *राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सांगली शहर जिल्हा कार्यकारणी.* 


शहर जिल्हाध्यक्ष- महालिंग हेगडे.


1) सांगली शहर अध्यक्ष -दत्ता पाटील.

2)सांगली शहर उपाध्यक्ष -आनंदा लीगाडे.

3)सांगली शहर उपाध्यक्ष- जुबेर मुजावर.

4)मिरज शहर अध्यक्ष - युवराज नाईकवाडे

5)मिरज शहर उपाध्यक्ष -आकाश कुंभार.

6)सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष- बापूसाहेब कोळेकर.

7)सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष-तेजश्रि अवघडे.

8)सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष- महेश जाधव.

9)सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष- सुहेल कुपवाडे.

10)सांगली शहर जिल्हा संघटक- संतोष शिंदे.

11)सांगली शहर जिल्हा सचिव - सागर शिंदे.

12)सांगली शहर जिल्हा सचिव - विनायक बलोलदार.

13)सांगली शहर जिल्हा संघटक - अमोल पाटील.

14)सांगली शहर जिल्हा संघटक - सागर पाटील.

15)सांगली शहर जिल्हा महिला संघटक सचिव- ऍड. प्रतीक्षा हेगडे.

16)सांगली शहर जिल्हा अतिरिक्त मुख्य संघटक - शामराव ठोंबरे.

17)सांगली शहर जिल्हा महिला संघटिका - डॉ.संजीवनी केंगार.

18) कार्यकारणी सदस्य- मयुरेश लोखंडे.

19) कार्यकारणी सदस्य- मयूर जाधव.

20)कार्यकारणी सदस्य- प्रकाश जामदार.

21)कार्यकारणी सदस्य- व्यंकटेश गुरव.

22)कार्यकारणी सदस्य- संतोष काळे.

23)कार्यकारणी सदस्य- प्रमोद लिमगिडे.

24) कार्यकारणी सदस्य- सुमित कुंभोजकर.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top