स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे तीन कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली असून एक रकमी एफ. आर .पी. व ज्यादा ३५०रुपयाची मागणी---*

0

 *स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे तीन कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली असून एक रकमी एफ. आर .पी. व ज्यादा ३५०रुपयाची मागणी---* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी)* 



 नुकत्याच *जयसिंगपूर* मध्ये झालेल्या *स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत* स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक रकमी एफ .आर. पी. सह व ज्यादा ३५० रुपये दिल्याशिवाय उसाला हात लावून देणार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान जयसिंगपूर येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिरोळ तालुक्यातील तीन कारखान्यांची ऊस वाहतूक बंद  पाडण्यात यशस्वी झाले आहेत. शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुपी शुगर कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखली आहे. जयसिंगपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत गतवर्षीच्या उसाची एफ. आर. पी .ची रक्कम अधिक २०० रुपये तातडीने जमा करावेत, कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत यासह इतर १३ ठराव मंजूर करण्यात आले असून, चालू गळीत हंगामात एक रकमी एफ.आर.पी. सह अधिक ३५० रुपये प्रति टन पहिली उचल द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान शिरोळ तालुक्यातील दत्तवाड मध्ये गुरुदत्त शुगर कारखान्याकडून सध्याची ऊस तोड थांबवण्याची मागणी आक्रमक स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती परंतु मागणीकडे दुर्लक्षित केल्यामुळे गुरुदत्त शुगर कडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर वर हल्ला करून अडवण्यात आले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ,सर्व कारखान्यानी दर जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक करू नये असा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री. डॉ. डी .वाय. पाटील साखर कारखान्याकडून ,चालू हंगामात पहिली उचल प्रति टन ३००० रुपये दिली जाणार असून, माजी मंत्री हसनमुश्री यांनीही एक रकमी एफ. आर. पी. देण्याची घोषणा केली आहे. जयसिंगपूर येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ,माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेल्या भूमिकेवर, कारखानदार काय निर्णय करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उसाचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून, स्वाभिमानी शेतकरी संघटने कडूनही आंदोलन आणखी तीव्र करण्याची शक्यता वाटत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top