चंद्रे येथील बी एस पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर* *- बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल*

0

 *चंद्रे येथील बी एस पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर* 


 *- बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची

दखल* 


 *- बेळगाव येथे उद्या शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण* 


 


 *कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्युज - विशेष प्रतिनिधी  नंदकुमार तेली)* चंद्रे (ता. राधानगरी जि. कोल्हापूर) येथील राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. पाटील (बळवंत सदाशिव पाटील)  यांना बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल "आंतरराज्य पुरस्कार" जाहीर झाला आहे.


 हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे देण्यात आले आहे. 

हा पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव (कर्नाटक) येथील अशोक नगरमधील धर्मनाथ भवनमध्ये उद्या शनिवार दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.


-  *बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य* 


चंद्रे येथील रहिवासी असलेले बी. एस. पाटील यांनी अल्पावधीतच बांधकाम व सामाजिक क्षेत्रात जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. त्यांचे मूळ नाव बळवंत सदाशिव पाटील असे आहे. मात्र, "बी. एस." म्हणून ते सर्व परिचित आहेत. बी. एस. यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 


 *....असे आहे पुरस्काराचे स्वरूप* 

हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, अभिनंदन पत्र, सन्मानपत्र, म्हैसूर फेटा व चंदनाचा हार असे आहे.


 *- या मान्यवरांची असणार प्रमुख उपस्थिती* 

आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळ्या वेळी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आदींसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार,  शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश उपस्थित राहणार आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top