हाफ मॅरेथॉन" स्पर्धा आयोजकाची आत्महत्या.

0

 "हाफ  मॅरेथॉन" स्पर्धा आयोजकाची आत्महत्या.


- शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील घटना.


कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्युज  : क्राईम प्रतिनिधी) कोल्हापुरात "हाफ  मॅरेथॉन" स्पर्धेची जाहिरातबाजी करत आयोजकाने ९०० हून अधिक स्पर्धकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार काल उघडकीस आला. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी आयोजक  वैभव पाटील आणि पत्नी पूनम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.  रात्री उशिरा पूनम पाटील हिला ताब्यात घेतले होते, तर वैभव हा पसार झाला होता.

दरम्यान, वैभवने मध्यरात्री शेतातील झाडाला फास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वैभव पाटील याने शाहूपुरी परिसरात ऑफिस सुरु करून "मराठा कमांडो सिक्युरिटी इंटेलिजेन्स मॅन पॉवर फोर्स" या नावाने वेबसाईटवर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती टाकली होती.  त्यानुसार तरुणांकडून महिनाभरात प्रत्येकी 2500 प्रमाणे पैसे भरून घेतले होते.

मात्र, स्पर्धेची तारीख जवळ आल्यानंतर देखील संपर्क होत नसल्याने फसवणूक झालेले लोक काल (शनिवारी) रात्री उशिरा एकत्र आले आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली. दिलेल्या फिर्यादीवरून दोघा विरोधात 6शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसानी संशयित पूनम पाटील हिला ताब्यात घेतले होते. दरम्यान, वैभवने मध्यरात्री शेतातील झाडाला फास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top