कोल्हापूरातील गंगावेश येथील शाहूकालीन वस्तीगृहाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन संचालक मंडळ बरखास्त करण्याची करण्याची आर.पी.आय पक्षाच्या वतीने मागणी.

0

 कोल्हापूरातील गंगावेश येथील शाहूकालीन वस्तीगृहाच्या भ्रष्ट  कारभाराची चौकशी होऊन संचालक मंडळ बरखास्त करण्याची करण्याची आर.पी.आय पक्षाच्या वतीने मागणी.


जनप्रतिसाद न्यूज:(कोल्हापूर प्रतिनिधी)कोल्हापूर शहरात मध्य वस्तीतील आर्य समाज न्यास या जुन्या संस्थेच्या विरोधात धर्मदाय आयुक्त यांच्या कडे आर. पी. आय. आठवले गटाकडून तक्रार दाखल केली गेली आहे. या संस्थेच्या भोंगळ कारभाराबद्दल अतिशय गंभीर स्वरूपाचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 


काही दिवसापूर्वी कोल्हापूरातील खादी ग्रामोद्योग या संस्थेतील गैर कारभार चव्हाट्यावर आला . त्यानंतर धर्मादाय आयुक्त यांना जाग आल्यावर त्यांनी कारवाई देखील केली . या कारवाईसाठी स्वत : जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत कारवाई केली. आर. पी. आय. आठवले गटाच्या वतीने आज पत्रकार परिषदेत घेण्यात आली त्यामध्ये  कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांनी आर्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याकामी गंगावेश या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची जागा संस्थेला दिली . मात्र संस्थेने या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधले व उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण केले . पुढे जाऊन या संस्थेच्या कारभारात काही अप्रवृत्तीच्या संचालकांनी विळखा घालून मुळ उद्देश गुंडाळून ठेवत मनमानी कारभार सुरू केला . 


तीस वर्षाहून अधिक काळ या संस्थेत संचालक मंडळ अस्तित्वात नव्हते . तरीदेखील लाखो रूपयांची उलाढाल गाळे धारकांमधून झाली . आता तर या संस्थेची नुकतीच झालेली निवडणूक देखील वादात असताना तथाकथीत संचालकांनी गैर कारभाराचा कळस गाठला आहे . या सर्व प्रकाराबद्दल  धर्मादाय आयुक्त यांना रितसर तक्रार दिली असून या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे सांगण्यात आले.  कारण अशा संस्थांवर लक्ष ठेवणारा धर्मादाय विभाग हा इतके वर्षे याकडे कानाडोळा केलेला दिसून येतो. तसेच या संस्थेतील तथाकथीत संचालक हे प्रभावशाली असून हा गैरकारभार दडपून टाकतील अशी शंका यावेळी व्यक्त केली गेली.  कोल्हापूरातील छत्रपती शाहुनी सुरू केलेल्या समाजाच्या हितासाठीच्या संस्थेचा कारभार त्यांना अपेक्षित असा होईपर्यंत  लढा सुरू राहील असे आर.पी.आय.पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी जिल्हा नेते सतीश माळगे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top