*कोल्हापुरात आपत्कालीन परिस्थितीत, पोलीस सेवा मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांक 112 सेवेच्या सुविधाचा, मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ :-जयसिंह रिसवडकर*

0

 *कोल्हापुरात आपत्कालीन परिस्थितीत, पोलीस सेवा मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांक 112 सेवेच्या सुविधाचा, मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ :-जयसिंह रिसवडकर*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी)* 


 कोल्हापुरात गेल्या वर्षभर कार्यान्वित असलेल्या , पोलीस सेवेच्या सुविधाचा  आपत्कालीन परिस्थितीत लाभ होण्यासाठी, टोल फ्री क्रमांक 112  प्रतिसाद डायल प्रणालीचा उपयोग कोल्हापूरकर वासियांना मोठ्या प्रमाणात झाला आहे अशी माहिती नियंत्रण कक्षा अधिकारी जयसिंह रिसवडकर यांनी दिली. कोल्हापूर मध्ये सदरहू आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना, पोलीस सेवा टोल फ्री क्रमांक 112 प्रतिसाद डायल प्रणाली यंत्रणा कार्यान्वित होऊन 29 सप्टेंबर 2022 रोजी एक वर्ष पूर्ण झाले .आज पर्यंत आपत्कालीन परिस्थितीचा पोलीस सेवा टोल फ्री क्रमांक 112 प्रतिसाद डायल प्रणाली यंत्रणेच्या उपक्रमाअंतर्गत 11495 कॉल द्वारे नागरिकांना लाभ पोहोचला असल्याची माहिती नियंत्रण कक्षा अधिकारी जयसिंह रिसवडकर यांनी दिली आहे. गेले वर्षभर पोलीस सेवा टोल फ्री क्रमांक 112 आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल यंत्रणेचा उपयोग नागरिकांना करण्यासाठी अनुक्रमे 38 चार चाकी इ .आर. व्ही. वाहने व 46 दुचाकी इ.आर.व्ही. वाहने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी 24 तास कार्यान्वित आहेत. पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या पर्यंत मदत पोहोचण्यास ,सरासरी 16 मिनिटे 18 सेकंद इतका वेळ लागत होता .कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त करवीर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत कॉल ची नोंद झाली असून सध्या दिवसाला जवळपास सरासरी 40 ते 45 कॉल्स पोलीस यंत्रणेमार्फत पूर्ण केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पोलीस सेवा प्रतिसाद प्रणाली डायल क्रमांक 112 अंतर्गत एकूण सेवेसाठी 11 अधिकारी, डिस्पॅचर 31 अंमलदार व इ .आर. व्ही. वाहनावरील रिस्पॉन्डरसाठी 490 अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या कोल्हापुरात आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल क्रमांक 112 पोलीस सेवेचा लाभ होण्यासाठी नियंत्रण कक्षा 3 अधिकारी,2 0 पोलीस अंमलदार व 2 इंजिनियर सेवेच्या कार्यासाठी हजर आहेत. कोल्हापुरातील विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या बाबतीत, आपत्कालीन परिस्थितीत सदरहू सेवेचा लाभ, हा वेळेत पोहोचल्यामुळे ,त्यालोकांच्या बाबतीत बऱ्याच जणांना आत्महत्येपासून रोखण्यास मदत होत आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ठिकाणी सदरहू सेवेअंतर्गत पोलीस मदत तात्काळ उपलब्ध होत असल्यामुळे, नागरिकांचे सुद्धा प्राण वाचण्यास फार मोठी मदत होत आहे. त्याचबरोबर घरगुती वादातून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सुद्धा, सदरहू सेवेच्या प्रणालीचा फार मोठा लाभ, कोल्हापूरकर वासियांना होत असल्याचे दिसत आहे अशी माहिती नियंत्रण कक्षा अधिकारी जयसिंह रिसवडकर यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top