*कोल्हापुरातील काड सिद्धेश्वर स्वामी कनेरी मठात, दिनांक 20 फेब्रुवारी2023 ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत "पंचभौतिक महोत्सव" साजरा होणार --*

0

 *कोल्हापुरातील काड सिद्धेश्वर स्वामी कनेरी मठात, दिनांक 20 फेब्रुवारी2023 ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत "पंचभौतिक महोत्सव" साजरा होणार --* 



  संपादक ( जितेंद्र काळंञे )

कार्यकारी संपादक  ( उमेश तांदळे)

 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


कोल्हापूर येथील काड सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रयत्नाने, *दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत, न भूतो न भविष्यती असा " *पंचभौतिक* महोत्सव* " कणेरी मठ येथे साजरा होणार आहे. पंचभौतिक महोत्सवासाठी व पार्किंग साठी 500 एकर जागा उपलब्ध करण्यात आली आहे .पार्किंगच्या ठिकाणी चार चाकी व दुचाकी वाहनांचे टेकनिशियन्स उपस्थित असणार आहेत. देशातील सर्व ग्राम वैद्य यांना पंचभौतिक महोत्सव अधिवेशनासाठी तीन दिवस आमंत्रित करणार आहेत. सुमारे 200 डॉक्टर मिळून आयुर्वेदा संबंधी माहितीची गॅलरी उभारणार असून, त्याबाबत अद्यावत आयुर्वेदा संबंधी माहिती देणार आहेत. एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकरी वर्गांसाठी, देशभरातील विविध कंपन्यांच्या कडून छोटी छोटी व वेगवेगळी शेतकऱ्यांना शेतासाठी उपयुक्त लागणाऱ्या अवजारांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. देशभरातील छोटे छोटे कुटीर उद्योग व त्यांची माहिती, गृहिणी व बेरोजगारांना होण्यासाठी एक मोठे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तसेच देशातील देशी बीज यांचे एकत्रित प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. देशात उपलब्ध असलेल्या विविध देशी पदार्थापासून कोणकोणते खाद्यपदार्थ बनवता येतात, यासंबंधी अद्यावत माहिती या मोठ्या पंचभौतिक महोत्सवातून मिळणार आहे. पंचभौतिक महोत्सवा एकूण 1000 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. याशिवाय आणखी बरीच काही माहिती व स्टॉल असणार आहेत, तसेच स्वयंसेवकाचे काम करायला असलेल्या लोकांसाठी एक विशिष्ट ॲप तयार करण्यात येणार आहे .या पंचभौतिक महोत्सवा करता सात दिवसात देशभरातील सुमारे 30 लाख लोक भेट देतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तसेच पंचभोवती महोत्सवात उपस्थित असणाऱ्या चार लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या संबंधी आवश्यकतेनुसार आठशे गावात मदतीसाठी आवाहन करण्यात येणार आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील कमीत कमी 200 पर्यावरणवादी अभ्यासू लोकांना, निमंत्रित करणार असून सर्वजण उपस्थित राहणार आहेत. सदरहू पंचभौतिक महोत्सवा करता 40 देशांना आमंत्रण देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top