कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंह वाडी येथे, मंगळवार दिनांक 29/ 11/ 2022 ते शुक्रवार दिनांक 09/ 12/ 2022 अखेर "दत्तजयंती सोहळा" संपन्न होणार

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

 कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे, मंगळवार दिनांक 29 /11) 2022 ते शुक्रवार दिनांक 09 /12 /2022 अखेर 11 दिवस " *दत्त जयंती सोहळा"* व त्यानिमित्य कार्यक्रम संपन्न होणार आहेत. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्सव सोहळा प्रसंगी होणारे नित्याचे कार्यक्रम खालील प्रमाणे असणार आहेत. सकाळी पहाटे-5:00 वाजता काकड आरती, सकाळी 8:00 वाजता श्री गुरुचरित्र पारायण ,सकाळी 10:00 ते 12:00 लघुरुद्र अभिषेक, दुपारी 12:30 वाजता *महापूजा व महानैवेद्य*, दुपारी 01:30 ते 03:00 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 03:00 ते 04:00 पवमान पंचसूक्त पठण, दुपारी 04:00 ते 05:00 वाजेपर्यंत वेदमूर्ती श्री दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण, सायंकाळी 07:00 ते 09:00 वाजेपर्यंत धूप- दीप आरती व पालखी कार्यक्रम, रात्री 09:30 ते 11:00 ह .भ. प. श्री. रोहित दांडेकर मिरज यांचे कीर्तन असे आहेत. *उत्सव प्रसंगी होणारे विशेष कार्यक्रम* खालील प्रमाणे होणार आहेत. मंगळवार दिनांक 29 /11/ 2022 रोजी सायंकाळी 05:00 ते 07:00 श्री. राजेंद्र मिस्त्री कोल्हापूर यांचे सुरमई प्रस्तुत भक्तीगीत- भावगीत गायन, बुधवार दिनांक 30/ 11 /2022 सायंकाळी 05:00 ते 07:00 श्री. निनाद शुक्ल पुणे यांचे गुरु नामाची ओढ संगीत कार्यक्रम, गुरुवार दिनांक  01/12/ 2022 सायंकाळी 05:00 ते 07:00 श्री. श्रीधर सुतार कोल्हापूर यांचे स्वरानंद वाद्य वृंद प्रस्तुत भक्तीगीत व भावगीत गायन, शुक्रवार दिनांक 02/12/ 2022 सायंकाळी 05:00 ते 07:00 कुमारी सावनी शिखरे पुणे यांचे भक्तीगीत व शास्त्रीय गायन, शनिवार दिनांक 03/12/2022 सायंकाळी 05:00 ते 07:00 वाजता श्री. मुकुंद बादरायणी पुणे यांचे स्वरसमर्थ अभंगवाणी प्रस्तुत भक्तीगीत व अभंग गायन, रविवार दिनांक 04/12 /2022 रोजी सायंकाळी 05:00 ते 07:00 वाजता श्री प्रथमेश लघाटे यांचे प्रथम स्वर प्रस्तुत अभंग भक्ती गीतांची मैफिल, सोमवार दिनांक 05/12/2022 रोजी सायंकाळी 05:00 ते 07:00 वाजता श्री रविराज दामले पुणे यांचे समर्पण स्वरूप प्रस्तुत भक्तीगीत- भावगीत व कविता गायन ,मंगळवार दिनांक 06/12/2022 रोजी सौ. दिपाली प्रसाद लोहार वारणानगर यांचे शास्त्रीय गायन व कृष्णा जितेंद्र भोसले मिरज यांचे तबलावादन, बुधवार दिनांक 07/12/ 2022 सायंकाळी 05:00 ते 07:00 वाजता ह. भ. प .श्री. रोहित दांडेकर मिरज यांचे कीर्तन व सायंकाळी 05:00 वाजता *दत्त जयंती सोहळा* संपन्न होणार आहे .गुरुवार दिनांक 08 /12/ 2022 रात्री 09:30 ते 11:00 वाजेपर्यंत ह. भ. प. श्री रोहित दांडेकर मिरज यांचे कीर्तन व शुक्रवार दिनांक 09 /12/ 2022 पहाटे 05:00 ते 07:00 वाजेपर्यंत ह. भ. प. श्री. रोहित दांडेकर यांचे लळिताचे कीर्तन होणार आहे .तरी सर्व दत्तभक्त आणि दत्तभाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थान समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top