पुण्यातील अलंकापुरीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726 व्या संजीवनी समाधी सोहळ्याला व कार्तिकी एकादशीच्या यात्रेला धार्मिक ,आनंदमय वातावरणात सुरुवात --*

0

 *पुण्यातील अलंकापुरीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726 व्या संजीवनी समाधी सोहळ्याला व कार्तिकी एकादशीच्या यात्रेला धार्मिक ,आनंदमय वातावरणात सुरुवात --* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 पुण्यातील अलंकापुरी माऊलींच्या संजीवनी समाधी 726 व्या सोहळ्याला व कार्तिक एकादशीच्या यात्रेला, आजपासून अतिशय धार्मिक आनंदाच्या वातावरणात, सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 726 वा संजीवनी समाधी सोहळ्याचा सप्ताह 22 नोव्हेंबर पर्यंत चालणार असून, महाराष्ट्र राज्यातील व बाहेरील राज्यातील लाखोंच्या संख्येने वारकरी व त्यांच्या दिंड्या अलंकापुरी आळंदीत दाखल झाल्या आहेत व आणखी काही दिंड्या दाखल होत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा 726 वा संजीवनी समाधी सोहळा, निर्बंध मुक्त वातावरणात साजरा होत असून, सगळीकडे आनंदमयी उत्साही धार्मिक वातावरण बघावयास मिळत आहे.



 महाराष्ट्र राज्यातील व अन्य राज्यातून सुमारे दहा ते बारा लाख वारकरी भक्त आळंदीतील अलंकापुरीत, यंदाच्या वर्षी हजेरी लावतील व ज्ञानियांचा राजा असलेल्या अलंकापुरीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याचा व कार्तिकी एकादशीच्या यात्रेचा धार्मिक आनंद लुटतील



. आज प्रथेप्रमाणे सकाळी *श्री गुरु हैबत बाबा यांच्या पायरीच्या पूजनाने सोहळ्याला* सुरुवात झाली. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी, आळंदीतील अलंकापुरीत अनेक वारकरी भक्तांच्या दिंड्या दाखल होत असून, आणखी काही वारकरी भक्तांच्या दिंड्या, *टाळ -मृदुंग -विणा* यांच्या संगीतमय भजनाच्या गजरात दाखल होत असून ,सर्वच परिसरात *धार्मिक* *चैतन्यमय* वातावरण निर्माण झाले  आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top