सांगली जिल्ह्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत जवळपास 733 जनावरांचा मृत्यू व 67 लाख रुपयांचे अनुदान पशुपालकग्रस्तांना वाटप--*

0

 *सांगली जिल्ह्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत जवळपास 733 जनावरांचा मृत्यू व 67 लाख रुपयांचे अनुदान पशुपालकग्रस्तांना वाटप--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 सांगली जिल्ह्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे, आत्तापर्यंत जवळपास 733 जनावरे मृत्युमुखी पडली असून, जवळपास 278 जनावरांच्या पशुपालकांना सुमारे 67 लाख 18 हजार रुपयांचे मदत अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या गाईसाठी 30000 रुपये, बैलासाठी 25000 रुपये व वासरू मयत झाल्यास 15000 रुपये आर्थिक सहाय्य मदत देण्यात येते. जिल्ह्यातील जनावरांच्या पशुपालकांच्या मते ही मदत अत्यंत तोकडी असून, महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी जिल्ह्यातील जनावरांच्या पशुपालकांनी केली आहे. आत्तापर्यंत 67 लाख 18 हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप पशुपालकांना केले असून, जवळपास 278 जनावरांच्या पशुपालकांचा समावेश यात आहे. आणखी जवळपास 163 जनावरांच्या पशुपालकांना मदतीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर ,त्या जनावरे पशुपालकानाही सत्वर अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे .लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावर मृत्युमुखी पडल्यास ,संबंधित जनावराचा फोटो काढून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन, तो संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत सादर झाल्यानंतर, आठ दिवसात जनावरे पशुपालकांना आर्थिक अनुदानाची मदत दिली जाते. सांगली जिल्ह्यात जनावरांचे 100% लसीकरण पूर्ण होऊनही, लम्पी प्रादुर्भावाने जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. आणखी एक महिनाभर तरी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव अस्तित्वात राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top