सांगली --ता. 8/ 11/ 2022 ,वार मंगळवार रोजी भारतात दिसणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणा विषयी माहिती--*

0

 *सांगली --ता. 8/ 11/ 2022 ,वार मंगळवार रोजी भारतात दिसणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणा विषयी माहिती--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

संपादक ( जितेंद्र कळंञे)

कार्यकारी संपादक  (उमेश तांदळे)

  

अनिल जोशी  (सांगली)

 *कार्तिक पौर्णिमेस* म्हणजे 8/ 11/ 2022 ,वार मंगळवार रोजी, *भारतासह* संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया ,अमेरिकेच्या ,पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिकेमध्ये  हे खग्रास चंद्रग्रहण दिसेल .भारतात कुठेही *ग्रहण स्पर्श दिसणार* नसल्याने ,चंद्रग्रहण भारतात सर्वत्र *ग्रस्तोदित* स्वरूपात दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्र प्रतिबिंब उदयास येईल .त्यामुळे भारतात कुठेही ग्रहण स्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही भागात, *ग्रहण खग्रास अवस्था* मध्ये दिसू शकेल. मात्र *महाराष्ट्र* आणि इतर प्रदेशात हे ग्रहण *खंडग्रास चंद्रग्रहण* दिसेल.

 *मुंबई*- येथील खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा खालील प्रमाणे- ग्रहणाचा स्पर्श -आरंभ 8/ 11 /2022, वार मंगळवार रोजी दुपारी 02: 39मि. वाजता होईल व खग्रास चंद्रग्रहणाचा मध्य याच दिवशी सायंकाळी 04:30 वाजता होईल. त्याचप्रमाणे याच दिवशी सायंकाळी 06:19 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण समाप्ती होईल. एकूण ग्रहण आरंभापासून ,ग्रहणाचा समाप्तीपर्यंतचा कालावधी 03 तास 40 मिनिटं असून ,या संपूर्ण वेळा *भारताकरता* असणार आहेत. ग्रहणाच्या आरंभा पासून म्हणजेच ग्रहण स्पर्शापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे समाप्तीपर्यंतचा काल ,हा *पुण्यकाल* म्हणून गणला गेला जातो .चंद्रग्रहणापूर्वी चंद्र सूर्याच्या छायेत येऊ लागतो, त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू मिळून होण्यास आरंभ होतो ,यालाच *ग्रहणाचे वेध* असे म्हणतात. हे चंद्र ग्रहणग्रस्तोदित आहे .भारतीय परंपरेनुसार चंद्रग्रहणाच्या स्पर्शाच्या वेळी स्नान करून ,आध्यात्मिक उपासना केली जाते व ग्रहण संपल्यानंतरही स्नान करून ,देवपूजा केली जाते .खग्रास चंद्रग्रहणाच्या समाप्तीनंतर स्नान करून ,तुलसी विवाह करण्यास हरकत नाही, परंतु तारीख 5/ 11 /2022 ते 7/ 11/ 2022 पर्यंत तुळशी विवाह करणे अधिक योग्य होईल असे दाते पंचांग कर्ते यांनी असे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top