*सांगलीतील जत मध्ये, श्री स्वामी समर्थ चारी टेबल ट्रस्टच्या वतीने, स्वामी समर्थ मंदिर दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त झी टॉकीज प्रस्तुत, "गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा" या अंतर्गत होणार किर्तन सोहळा* *कार्यक्रम --*

0

 *सांगलीतील जत मध्ये, श्री स्वामी समर्थ चारी टेबल ट्रस्टच्या वतीने, स्वामी समर्थ मंदिर दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त झी टॉकीज प्रस्तुत, "गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा" या अंतर्गत होणार किर्तन सोहळा* *कार्यक्रम --* 
 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 सांगलीतील जत मध्ये श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत आयोजित, श्री स्वामी समर्थ मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, झी टॉकीज प्रस्तुत, " *गजर कीर्तनाचा ,सोहळा आनंदाचा* " हा कार्यक्रम *दिनांक 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2022* पर्यंत दुसऱ्यांदा संपन्न होत आहे. दिनांक *23 नोव्हेंबर 2022 वार बुधवार रोजी,* कीर्तनाची वेळ सकाळी 11:00 ते 1:00,  दुपारी 3:00 ते 5:00 व सायंकाळी 7:00 ते 9:00 यावेळेत, भागवताचार्य ह .भ .प .सौ. संगीता ताई चोपडे ,ता. मावळ जि. पुणे यांचे कीर्तन होणार असून, प्रकाश जमदाडे संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे उपस्थितीत होणार आहे .सदर कार्यक्रमाचे प्रायोजक श्री महेश डोळे प्रसिद्ध नारळाचे व्यापारी जत हे असणार आहेत. *गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी* भागवताचार्य ह .भ .प. सौ. संगीता ताई चोपडे, येनपुरे ता. मावळ जि. पुणे यांचे सकाळी 11:00 ते 1:00, दुपारी 3:00 ते 5:00, सायंकाळी 7:00 ते 9:00 यावेळी कीर्तन होणार असून, श्री सुरेश शिंदे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली व शशिकांत काळगी, प्रगतिशील शेतकरी यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक कै. शिवाजी काळगी यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत काळगी व श्री स्वप्निल शिंदे ,नगरसेवक जत असणार आहेत. *शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी* कीर्तनकार भागवताचार्य ह .भ .प. सौ. संगीता ताई चोपडे, येनपुरे ता. मावळ जि. पुणे यांचे सकाळी 11:00 ते 1:00, दुपारी 3:00 ते 5:00 ,सायंकाळी 7:00 ते 9:00 या वेळेत कीर्तन होणार असून ,या कार्यक्रमास माजी आमदार श्री. विलासराव जगताप ,सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष संग्राम भाऊ जगताप ,माजी नगरसेवक उमेश सावंत हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री डी. बी. जाधव, श्री स्वामी समर्थ चारीटेबल ट्रस्ट जत हे असणार आहेत. *शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी* कीर्तनकार ह. भ. प. अनिल महाराज दुबुले आटपाडी सांगली, ह. भ .प .सौ. अनिताताई महाराज पाटील आळंदी पुणे ,संस्कृताचार्य गोरक्षनाथ महाराज उदागे आळंदी पुणे यांची सकाळी 11:00 ते 1:00, दुपारी 3:00 ते 5:00, सायंकाळी 7:00 ते 9:00 या वेळेत कीर्तन होणार असून, या कार्यक्रमास जतचे आमदार विक्रम सिंह सावंत ,जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे प्रायोजक स्व. अशोक दादा शिंदे यांच्या स्मरणार्थ, स्व  अशोक दादा शिंदे दूध शीतकरण केंद्र जत ही संस्था असणार आहे. सदरहू कार्यक्रमाच्या ठिकाणी दररोज दुपारी 1:00 ते 2:00 व रात्री 9:00 वाजता सोहळ्या दरम्यान, नियमित प्रसाद असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री बापूसाहेब पवार अध्यक्ष श्री स्वामी समर्थ चारी ट्रिबल ट्रस्ट जत व सर्व स्वामीभक्त परिवार करणार आहेत. या कार्यक्रमाचे *स्थळ श्री स्वामी समर्थ मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, सांगली रोड तालुका जत, जि. सांगली* हे असणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top