*सांगली जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न --*

0

 *सांगली जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न --*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 


सांगली जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.महापालिकाक्षेत्रामध्ये आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेमध्ये सांगली,मिरज,कुपवाड शहर महापालिकाक्षेत्रामधील व ग्रामीण भागातील जवळपास 354 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट किल्ल्याचे बक्षिस खुला गट शहरी प्रथम क्रमांक (विजयदुर्ग) शिवकवच मंडळ सांगली,द्वितीय क्रमांक विभागुन(गजेंद्र गड,विशाळगड,पावनखिंड)शिवभारत ट्रेकर्स सांगलीवाडी व अजिंक्य रौद्र शंभो युवा मंच मिरज व तृतिय क्रमांक विभागुन पैलवान ग्रुप मिरज,हिंदवी स्वराज्य ग्रुप सांगलीवाडी व गणेश काॅर्नर सांगली यांना पारितोषिक देण्यात आले.

ग्रामीण मधील प्रथम क्रमांक(रायगड) दुर्गनाद प्रतिष्ठान कवलापूर,द्वितीय क्रमांक(राजगड) स्वराज्य दौलत कवलापूर तृतीय क्रमांक(राजगड) शिवराज कदम व सानिका कदम बामणोली यांना देण्यात आले.तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

.


महापालिकाक्षेत्रामधील बालमावळ्यांनी दिलेला उदंड प्रतिसादामुळे किल्ला स्पर्धा मोठ्या व व्यापक प्रमाणात घेण्यास प्रेरीत करून गेला.लहान मुलांना बालवयातच आपला प्रगल्भ, गौरवशाली इतिहास माहित व्हावा,इतिहासाबद्दल आकर्षण, कुतुहल निर्माण व्हावे.किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या सृजनशीलतेला,कल्पकतेला,सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच मुलांच्या स्पर्धाक्षम क्षमतेला उत्तेजन मिळावे,या हेतुने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .मुलांनी देखील आपल्या कल्पकतेचा,कलागुणांचा व क्षमतेचा पुरेपूर वापर करून सुबक,हुबेहुब किल्ले प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज,युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार , महापौर दिग्विजय सूर्यवंशी,सागर घोडके,बिरेंद्र थोरात,आयुब बारगीर, महालिंग हेगडे,विनायक हेगडे,अनिता पांगम,वंदना चंदनशिवे,शुभम जाधव,आदीत्य नाईक ,सुरेखा सातपुते , दत्ता पाटील , युवराज नायकवडे , छाया जाधव ,संगीता जाधव  यांच्यासह सर्वच फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी व किल्ला स्पर्धेतील सहभागी मंडळांचे स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचे संयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी सेवादल,राष्ट्रवादी कामगार सेल यांच्या वतीने अत्यंत चांगल्या पध्दतीने करण्यात आले त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top