अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, सांगली यांच्या वतीने पी.एन.जी. महाकरंडक अंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न --*

0

 *अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, सांगली यांच्या वतीने पी.एन.जी. महाकरंडक अंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न --* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *( अनिल जोशी* )अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगली यांचेवतीने पी.एन्.जी. महाकरंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्सचे संचालक श्री.सिद्धार्थ गाडगीळ, सौ.हिमगौरी गाडगीळ, श्री.राजीव गाडगीळ आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री.सुनिल फडतरे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन आणि दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समिती प्रमुख प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हनकर यांनी केले. तसेच पाहुण्यांचा सत्कार नियामक मंडळ सदस्य श्री.श्रीनिवास जरंडीकर, नाट्य परिषद शाखा सांगलीचे अध्यक्ष आणि नियामक मंडळ सदस्य श्री.मुकुंद पटवर्धन, सांगली शाखा उपाध्यक्षा सौ.अंजली भिडे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धेसंदर्भात मनोगत व्यक्त केले. नाट्य परिषद सांगली शाखेचे अन्य पदाधिकारी भालचंद्र चितळे, सनीत कुलकर्णी, हरिहर म्हैसकर, रवि कुलकर्णी, शशांक लिमये आणि स्पर्धा समिती सदस्य उपस्थित होते. 

आज तीन एकांकिकांचं सादरीकरण झालं. उद्या मंगळवार दि.7 रोजी सात एकांकिका होतील आणि बुधवार दि.8 रोजी सात एकांकिका होतील. त्यानंतर संध्याकाळी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. एकांकिका सादर करणाऱ्या कलाकारांच्या या स्पर्धेच्या निमित्य उत्साह जाणवत होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top