लक्ष्मीपुरीतील प्लास्टिकच्या अवैध धंद्याविरोधात महापालिकेची कारवाई.

0

 लक्ष्मीपुरीतील प्लास्टिकच्या अवैध धंद्याविरोधात महापालिकेची कारवाई.



कोल्हापूर (प्रतिनिधी):- मयूर कांदळकर.


कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिबंधीत प्लास्टिक विक्री जोरात सुरू आहे. तत्कालीन पालिका आयुक्त कलशेट्टी यांच्या कार्यकाळात असे अवैध धंदे व्यावसायिक चोरीछुपे व्यवसाय करीत होते, मात्र त्यावेळी कारवाई मोठया प्रमाणात दाखल करण्यात आल्या होत्या. आता मात्र या अवैध प्लास्टिक व्यवसाय करणाऱ्यांच्या मध्ये कसलीही भीती किंवा धाक राहिला नाही असेच म्हणावे लागेल. 


आज शहरात लक्ष्मीपुरी व्यापार पेठे मध्ये एक अशा व्यापाराचा पोल खोल करण्यात आला आहे. त्याच्या दुकानात लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित माल मिळून आला. याबाबत प्रसार माध्यमातून संबंधित पालिका आरोग्य निरीक्षक मनोज लोटे यांना फोन करून त्या दुकानाच्या समोर बोलावले. मात्र त्यांच्या येण्याच्या काही वेळाअगोदर त्या दुकानदाराने तेथुन पळ काढला. त्याचा पाठलाग करून मनोज लोटे यांनी त्याला दुकानातील माल जप्त करण्यासाठी प्रयत्न केले. आणि प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  संबंधित इस्टेट अधिकारी यांना ते दुकान सील करण्यासाठी कळवण्यात देखील आले. मात्र अशा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्या चा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पालिका आयुक्त यांनी स्वतः लक्ष दिले पाहिजे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top