सांगलीच्या, सांगली मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी श्रीमती स्मृती पाटील यांची शासनाकडून नियुक्ती--*

0

 *सांगलीच्या, सांगली मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी श्रीमती स्मृती पाटील यांची शासनाकडून नियुक्ती--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 सांगलीच्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी स्मृती पाटील यांची दोन वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन आदेश क्रमांक: प्रतिनि 2022/ प्र.क्र. १९७/ नवी- 14, दिनांक 17 नोव्हेंबर 2022, शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांच्या आदेशान्वये श्रीमती स्मृती पाटील यांची दोन वर्षाच्या कालावधी करता प्रतिनियुक्तीने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी श्रीमती स्मृती पाटील सहकार विभागातील सहाय्यक निबंधक या पदावर कार्यरत होत्या. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त पदी यापूर्वीही श्रीमती स्मृती पाटील यांनी साडेचार वर्षाचा कालावधीसाठी काम केले असून त्यांची पुन्हा नेमणूक झाली आहे. त्यांची यापूर्वीची कामगिरी अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top