*सांगली ,मिरज व कुपवाड महापालिकेच्या गैर कारभारा विरोधातील तक्रारीत, विभागीय आयुक्तांच्या कडे झालेल्या सुनावणीत आढळले तथ्य---*

0

 *सांगली ,मिरज व कुपवाड महापालिकेच्या गैर कारभारा विरोधातील तक्रारीत, विभागीय आयुक्तांच्या कडे झालेल्या सुनावणीत आढळले तथ्य---* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी* )



 गेले काही दिवस महापालिकेच्या विविध घोटाळ्यासंबंधी लोकायुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या .यात प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते वि.द.बर्वे, नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखरकर, तानाजी रुईकर, व रवींद्र चव्हाण आदी तक्रारदारांचा समावेश होता. सदरहू  तक्रारींच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांकडून, विभागीय आयुक्त सौरभ राव यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर ,आज सुमारे तीन तासाच्या चाललेल्या सुनावणी दरम्यान तक्रारीत तथ्य असल्याचे मत विभागीय आयुक्तांचे झाले असून आजच्या झालेल्या तक्रारी संदर्भातील संपूर्ण सुनावणीचा वस्तुनिष्ठ अहवाल, लोकायुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्व तक्रारदारांसह महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे आधी पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या गैर कारभाराबाबत आवाज उठवलेल्या तक्रारदारांची प्रशंसा केली. यापूर्वीच्या सन 2001 ते 2010 या कालावधीत झालेल्या विविध प्रकरणातील विशेष लेखापरीक्षणात नोंदवण्यात आलेले आक्षेप ,न्यायालयाने ग्राह्य मानून संबंधिताच्या वर जबाबदारी निश्चित करून, वसुलीचे निर्देश यापूर्वी आदेश दिले होते. तथापि अद्यापी कोणतीही कार्यवाही याबाबतीत झालेली नाही. वरील गोष्टी संबंधित तक्रारदारांनी लोकायुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणली होती. सुमारे दहा विविध प्रकरणांच्या संदर्भातील गैरव्यवहाराबाबत, लोकायुक्तांनी दखल घेऊन विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखाली चौकशीचे आदेश देण्यात आले होते. लवकरच विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे कडून, लोकायुक्तांना सदरहू प्रकरणांच्या सुनावणी बाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर होईल.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top