*कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या प्राचीन इतिहास माहितीसाठी ग्रंथालय उभारण्यात येणार---*

0

 *कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या प्राचीन इतिहास माहितीसाठी ग्रंथालय उभारण्यात येणार---*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 कोल्हापुरातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा इतिहास हा फारच प्राचीन असून, प्राचीन इतिहासाची माहिती देवी भक्तांना व्हावी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री. अंबाबाई मंदिराच्या प्राचीन इतिहासाच्या माहितीसाठी ग्रंथालय उभारण्याची संकल्पना तयार केली आहे. भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्राचीन इतिहास लाभलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असे करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर असून,  दररोज लाखो देवीभक्तांची अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येजा होत असते. 


कोल्हापुरातील श्री. करवीर निवासिनी अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना, शहराचा इतिहास व देवीची माहिती होण्यासाठी, हा ग्रंथालय उभारण्याचा उपक्रम, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कडून होत आहे. देवी भक्तांना देखील याची उत्सुकता आहे. कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी हे देखील सांगितले आहे की- शके 1786 मधील एक हस्तलिखित ग्रंथालयासाठी उपलब्ध झालेले आहे. हे शके 1786 मधील उपलब्ध झालेले हस्तलिखित हे अद्भुत दुर्मिळ ठेवा आहे. हे हस्तलिखित पूर्वीच्या हातभट्टीच्या कागदावर असून, नैसर्गिक शाइ च्या साह्याने लिहिण्यात आले आहे .अशा कित्येक हस्तलिखित ग्रंथांच्या संदर्भाचा उपयोग माहितीसाठी घेऊन, पुस्तक निर्माण होत असते .महाराष्ट्रातील देवीभक्त भाविकांना, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आव्हान करण्यात येत आहे की असे हस्तलिखित ग्रंथ कोणाकडे उपलब्ध असतील तर ते  ग्रंथालयाच्या उभारणीसाठी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे द्यावेत. सदरहू ग्रंथालय उभारणीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून, लवकरच या ग्रंथालय उभारणीच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top