*सांगली जिल्ह्यातील वाळवा ग्रामपंचायत व नेते गौरवभाऊ नायकवडी यांनी विशेष प्रयत्न करून, वाळवा गावासाठी जलजीवन कार्यक्रमांतर्गत विस्तारित पाणीपुरवठा योजना मंजूर करून* *आणली--*

0

 *सांगली जिल्ह्यातील वाळवा ग्रामपंचायत व नेते गौरवभाऊ नायकवडी यांनी विशेष प्रयत्न करून, वाळवा गावासाठी जलजीवन कार्यक्रमांतर्गत विस्तारित पाणीपुरवठा योजना मंजूर करून* *आणली--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 सांगली जिल्ह्यातील वाळवा ग्रामपंचायतने व नेते गौरव भाऊ नायकोडी यांनी विशेष प्रयत्न करून, महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन कार्यक्रमांतर्गत, गावातील मळे भागातील पुढील 25 वर्षाची वाढणारी लोकसंख्येचा विचार करून, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ,7 कोटी 97 लाख 53 हजार रुपये इतक्या रकमेची विस्तारित पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे .यासाठी वाळव्याचे नेते गौरव भाऊ नायकोडी व ग्रामपंचायत वाळवा यांनी फार मोठे प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी यात जातीने लक्ष घालून फार मोठे मोलाचे सहकार्य केले आहे. वाळवा गावातील मळेभागातील नागरिकांनी सदरहू पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारित योजनेचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. वाळवा गावातील मळे भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेले कित्येक दिवस प्रलंबित असून, नागरिकांना पाण्याचा प्रश्न फार भेडसावत होता. सदरहू प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छता व ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जातीने लक्ष घालून व नेते गौरव भाऊ नायकोडी व वाळवा ग्रामपंचायत यांनी विशेष प्रयत्न करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top