सांगली जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांची अचानक भेट ,सक्त प्रशासकीय कारवाईचा इशारा ---*

0

 *सांगली जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांची अचानक भेट ,सक्त प्रशासकीय कारवाईचा इशारा ---* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)*  महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेल्या सूचनेनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी आज अचानक जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी केली असता, बऱ्याच प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर, संबंधित कर्मचाऱ्यांच्यावर नियमाचे पालन करा अन्यथा प्रशासकीय कारवाई करू असा इशारा दिला आहे .दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिलेल्या अचानक भेटी मध्ये, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कासेगाव, बावची, आळसंद, ढालगाव, एरंडोली व खंडेराजुरी आधी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहायिका सेविका , फार्मासिस्ट अधिकारी व वाहन चालक आदी शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिलेल्या भेटी व पाहणी दरम्यान आळसंद मधील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बंद असल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक ही अनुपस्थित होते. वाळवा तालुक्यातील बावची येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित असूनही, केंद्राच्या परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून आले. त्याचप्रमाणे कवठेमंकाळ तालुक्यातील ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकंदर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सह सर्वच गोष्टीत समाधानकारकता काम दिसून आल्यामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे .मिरज तालुक्यातील एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आढळून आली. वाळवा तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडल्यामुळे, संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top